एक्स्प्लोर

Pune Crime news : लष्करातील जवानाचा कारनामा! प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक; प्रेयसीसह जवानाला बेड्या, कसा रचला डाव?

लष्करातील जवानाच्या प्रेमात (Pune Crime news)  पडली आणि प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला. पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत, एक कोटींचा विमा हडपायचा कट ही रचण्यात आला, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

पुणे : लष्करातील जवानाच्या प्रेमात (Pune Crime news)  पडली आणि प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला. पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत, एक कोटींचा विमा हडपायचा कट ही रचण्यात आला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकानं त्यांचं बिंग फोडलं. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्यात. यामुळं सैन्य दलात खळबळ उडाली. सुप्रिया गाडेकर असं पत्नीचं, सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनवणे असं साथीदाराचे नाव आहे. तर राहुल गाडेकर असं मयताचे नाव आहे.

सुप्रिया आणि सुरेशने कट रचला अन्...

राहुल आणि सुप्रियाचे सहा वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना चार वर्षाचा मुलगा ही आहे. संसार सुखात सुरु होता. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत सत्तर हजारांच्या नोकरीवर होता. सुप्रिया आधी परिचारिका तर नंतर कोरोनाकाळात तिने लॅब सुरु केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचे ही चार वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्यांना ही दोन वर्षांची मुलगी आहे. सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरु असताना ही त्यांनी याची कोणतीच फिकीर नव्हती. अशात सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. मग एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचं ठरलं. राहुलचा अडथळा दूर करताना त्याच्या नावे असणारा एक कोटींचा विमा हडपायचा, असा ही डाव त्यांनी आखला.

पुणे-नाशिक महामार्गावर पतीवर हल्ला केला पण राहुल...

ठरल्याप्रमाणे तीन महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये सुरेश दिल्लीवरून सुट्टीसाठी देहूत त्याच्या घरी आला. अहमदनगर जिल्ह्यातील आते-बहिणीच्या गावी जाऊन रोहिदासला याबाबत सांगितलं आणि तुला तुझ्या वाटणीचे पैसे दिले जातील, असं सांगून त्याला ही या कटात सहभागी करून घेतलं. दहा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पत्नीला भेटून, राहुल कामावर येत होता. याबाबत पत्नी सुप्रियाने पतीची खबर प्रियकर सुरेशला दिली. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहिदासने पाठलाग सुरु केला, पुढं घारगाव जवळ या दोघांनी राहुलच्या गाडीवर हल्ला करत, त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण राहुल यातून बचावला. जखमी अवस्थेत राहुल नगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.

या घटनेमुळं घाबरलेल्या राहुलने घरातचं राहणं पसंत केलं. मात्र पत्नी सुप्रियाने किती दिवस घरी बसून राहणार, असं म्हणत कामावर जाण्याचा तगादा लावला. मग राहुलने कंपनीला विनंती करून रात्रपाळी सुरु करून घेतली आणि नऱ्हे आंबेगावमध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी राहायचं ठरवलं. याबाबत पत्नीने प्रियकर सुरेशला याची कल्पना दिली. मग सुरेशने रोहिदासच्या सोबतीने रेकी करायला सुरुवात केली. 23 फेब्रुवारीला पती पत्नीच्या मामाच्या घरातून चाकण एमआयडीसीमधील कंपनीत कामासाठी निघाला. तो घरातून बाहेर पडताच पत्नीने सुरेशला कळवलं आणि त्या दोघांनी राहुलला रस्त्यात गाठलं.

गाडी आडवी मारून त्याला खाली पाडलं, मग पाठीवर उभं राहून, हातोडीनं डोक्यावर प्रहार केला. त्याचा मृत्यू झालाय हे पडताळून, ते दोघे तिथून पसार झाले. मग अपघात होऊन राहुलचा मृत्यू झालाय, असा बनाव केला. राहुलच्या नामे एक कोटींचा असणारा विमा आपल्याला मिळावा हा त्यामागचा आणखी एक हेतू होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक तपास केला अन पत्नीसह प्रियकराचे बिंग फुटले. पत्नीला तर घरूनच बेड्या ठोकल्या, पण लष्करात कार्यरत असणारा सुरेश आधी दिल्ली अन तिथून सैन्य दलातील  टप्प्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला गेला होता. तिथं जाऊन सुरेशला आणि रोहिदासला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. तिघांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

इतर महत्वाची बातमी-

Vasant More Meet Sanjay Raut : पुण्यामध्ये वॉशिंग मशिन नकोच, माझंही मत तेच; संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget