Kamlesh Kamtekar: ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कमलेश कामतेकरचा प्रेरणादायी प्रवास
Kamlesh Kamtekar : आयुष्यात लाख संकटे येत असतात, मात्र जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करतात, विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. याचे उत्तम उदाहरण मुंबईतल्या कांदिवलीमधून पुढे आले आहे.
मुंबई : आयुष्यात लाख संकटे येत असतात, मात्र जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करतात, विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. याचे उत्तम उदाहरण मुंबईतल्या कांदिवलीमधून पुढे आले आहे. ही काहणी आहे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अशा मराठी तरुणाची, ज्याची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या तूफान वायरल झाली, आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक व्हायला लागलंय. कॉर्पोरेट क्षेत्रात 14 वर्षाचा ग्राफिक डिझायनरचा अनुभव असताना एक दिवस अचानक नोकरी जाते. पाच महिने नोकरी मिळेल याची तो वाट बघतो, आणि शेवटी नोकरी मिळाली नाही म्हणून रडत न बसता थेट नवी कोरी रिक्षा घेऊन ऑटो रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करायचा निर्णय घेतो. हा धाडसी निर्णय घेणारा कमलेश कामतेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. शिवाय कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक तरुणाला शिकवण देणारी त्याची ही कहाणी अनेकांना प्रेरणादायी आहे.
हाती घेतली रिक्षा अन् आयुष्याचा पुढचा गिअर
मुंबईतल्या कांदिवलीमध्ये एका छोट्याशा घरात राहणाऱ्या कमलेश कामतेकरने लिंक्डइन पोस्ट करत त्याचा रिक्षा सोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मागच्या पाच महिन्यात त्याच्यासोबत जे काही झालं ते त्यानं त्यात मांडलंय. ग्राफिक डिझायनिंगमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर या मोठ्या पदावर काम करणारा कमलेश ज्याला 14 वर्षाचा या क्षेत्रात अनुभव आहे. पाच महिन्यापूर्वी कंपनीच्या कॉस्ट कटिंगमध्ये त्याचा जॉब गेला. जॉब गेला म्हणून अस्वस्थ न होता किंवा हारून न जाता परिस्थितीशी दोन हात करणारा कमलेश मागील पाच महिन्यापासून आपल्याला कुठे ना कुठे नोकरी मिळेल या आशेने जगत होता. काही कंपन्यांमध्ये कमी पगारात काम करण्याची ऑफर त्याच्याकडे आली. तर काही कंपन्यांनी त्याला होल्डवर ठेवलं. कुठलेही आर्थिक पाठबळ नसलेला कमलेश एक एक दिवस मोठा हलाखीच्या परिस्थितीत काढत होता.
"अब भाड मे जाये नोकरीं, अब खुदगा बिझनेस करेंगे"
दरम्यान, जेव्हा नोकरी शिवाय उदरनिर्वाह करणं शक्य नसल्याचं कमलेशला दिसलं. तेव्हा कमी पगारात आपल्या कामाचा स्वाभिमान गहाण ठेवून काम करण्यापेक्षा कॉर्पोरेट नोकरीला लाथ मारण्याचे त्याने ठरवलं आणि वेगळा निर्णय घ्यायचं ठरवलं. आपल्या पोस्टमध्ये -"अब भाड मे जाये नोकरीं, अब खुदगा बिझनेस करेंगे" म्हणत कॉर्पोरेट क्षेत्रात वावरणाऱ्या तरुणाचा फॉर्मल पोशाख बाजूला ठेवून ऑटो रिक्षा ड्रायव्हरचा युनिफॉर्म घातला आणि रिक्षाचे स्टेअरिंग पकडत आयुष्यात पुढचा गिअर टाकला. लोक काय म्हणतील? याचा कुठलाही विचार मनात न आणता आता हेच आपलं काम आनंदाने जिद्दीने करायचं कमलेशने ठरवलं.
रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मागे पाहायचं नाही, आता यातच पुढे जायचं हे मनाशी पक्क कमलेशने ठरवलं. आपली पोस्ट वायरल झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि जॉब ऑफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऑफर कमलेश न बाजूला ठेवल्या आणि तुझ्या गरजू तरुणांना या जॉबची गरज आहे, त्यांना तुम्ही द्या. असे स्पष्ट सांगितलं. कॉर्पोरेट कंपनीत तासंतास गाढवासारखं काम करण्यापेक्षा मला एक नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाल्याचं कमलेश सांगतोय. हा एक स्टंट किंवा पब्लिसिटी नाही तरुणांनी नवी सुरुवात करावी जॉब गेला म्हणजे हारायचे नाहीतर ही नवी सुरुवात असल्याचं कमलेश कॉर्पोरेट मधील नव्या पिढीला सांगतोय
खरंतर आपण आतापर्यंत अगदी गरिबीतून हलाखीच्या परिस्थितीतून मोठ्या पदापर्यंत पोचलेली माणसं आणि त्यांची उदाहरणं बघितली. मात्र कमलेश कामतेकरचे उदाहरण हे वेगळं आहे. कोणतेही काम छोटं किंवा मोठं नाही, तर छोट्या कामाला सुद्धा मोठं करण्याची जिद्द कमलेशने मनाशी बाळगली आहे. त्यामुळेचं जॉब गेल्यानंतर सुद्धा या तरुणाने हार न मानता "भाड मे जाये नोकरी" म्हणत नवीन रिक्षा घेत नवी सुरुवात केलीये. कॉर्पोरेट क्षेत्रात तासानतास काम करणाऱ्या तरुणांसाठी कमलेश कामतेकरचा हा निर्णय एक धडा आहे. जॉब गेला किंवा जॉब मिळत नाहीये म्हणून हार न मानता नवी सुरुवात करायची कमलेशची डेअरिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्याच्या निर्णयाला आणि नव्या सुरुवातीला एबीपी माझा कडूनसुद्धा शुभेच्छा.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI