एक्स्प्लोर

Pune Crime News : नीट परीक्षेत 720 पैकी 710 मार्क, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवत गळ्यावर चालवली सुरी; चिठ्ठीत शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख करत लिहलं...

Pune Crime News : 12 मे ला पहाटेच्या सुमारास त्याने पुण्यातूनच आई-वडिलांना सुसाईड नोट पाठवून टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे: पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली होती. भोपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने पुण्यात आपलं जीवन संपवलं. व्हॉटसअ‍ॅप मेसेद्वारे आई-वडिलांना सुसाईट नोट पाठवली, स्वतःच्या व्हॉट्सॲप (WhatsApp) वर स्टेटस ठेऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली होती. उत्कर्ष हा मूळचा बीडमधील रहिवाशी होता. तो सध्या भोपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. 12 मे ला पहाटेच्या सुमारास त्याने पुण्यातूनच आई-वडिलांना सुसाईड नोट पाठवून टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

नेमकं काय घडलं?

या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावाला कंटाळून स्वतःचा गळा कापत पुण्यात आत्महत्या केली आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय 19 वर्षे) असे टोकाचं पाऊल उचलेल्या तरुणाचे नाव आहे. उत्कर्ष हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, त्याचबरोबर तो उपचार सुद्धा घेत होता. पुण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या क्रीडा महोत्सवाला आलेले असताना त्याने राहत्या खोलीत ऑनलाइन सुरी मागवून स्वतःचा गळा कापत आत्महत्या केली. उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सॲप वर सुसाईड नोट लिहली होती, याप्रकरणी वानवडी पोलीस यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

मित्राला तिकीट बुक करायला लावलं अन्...

उत्कर्ष हा भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो ८ मे रोजी पुण्यातील एएफएमसी मैदानावर आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. सोमवारी पहाटे उत्कर्षने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये स्वतःवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने महाविद्यालयाच्या फेस्टिव्हलमध्ये आपल्या मित्रांसोबत डीजे नाईटचा आनंद घेतला होता. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी भोपाळला परतण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना तिकीट बुक करून द्यायला सांगितलं होतं. पण १२ मे रोजी पहाटे त्याने अचानक हे टोकाचं पाऊल उचललं.

ऑनलाइन चाकू ऑर्डर केला

शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे एका २० वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याने स्वतःवर चाकूने वार करून आपलं आयुष्य संपवलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बाथरूममध्ये उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली. पोलिस तपासात समोर आले की उत्कर्षने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाइन मागवला होता. त्याच चाकूने त्याने स्वतःवर वार करत टोकाचं पाऊल उचललं.

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

मी उत्कर्ष शिंगणे, भोपाळमधील एम्सचा विद्यार्थी आहे. शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे मी स्वतःचा जीवन संपवत आहे. मी शिक्षणमंत्र्यांना विनंती करतो की अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच आणि रशियन इतिहास काढून टाकावा आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे चरित्र समाविष्ट करावे, असं त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. 

उत्कर्षला नीटमध्ये (NEET) परीक्षेत 720 पैकी 710 मार्क

उत्कर्ष अभ्यासात देखील खूप हुशार होता. उत्कर्षला नीट परिक्षेमध्ये (NEET) 720 पैकी 710 मार्क आले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget