Kishor Aware Murder Case : किशोर आवरेंच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; हत्येसाठी किती लाखांची दिली होती सुपारी?
पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची हत्या करण्यासाठी आरोपींना माजी नगरसेवक भानू खळदेंनी 50 ते 60 लाखांची सुपारी दिल्याचं समजत आहे.
Kishor Aware Murder case : पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली, हे आता समोर आलं आहे. त्यांची हत्या करण्यासाठी आरोपींना माजी नगरसेवक भानू खळदेंनी 50 ते 60 लाखांची सुपारी दिल्याचं समजत आहे. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाईल, अशी बोलणी झाल्याचं सांगत आरोपींनी माजी नगरसेवक भानू खळदेंचं बिंग फोडलं आहे. तसेच मुलगा गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने दहा लाख रुपये दिलेत. हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून लागेल तेव्हा देण्यात आल्याचंदेखील तपासात समोर आलं आहे.
चाळीस ते पन्नास लाखांची सुपारी?
या सगळ्या प्रकरणात खळदे बाप लेकाचे नाव समोर आलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे झालं असतं तर साधारण चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात हा सुपारीचा आकडा पोहचला असता. भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळं मुलगा गौरवसह भानू खळदे ही जानेवारीपासून या कटात सहभागी असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आलंय. त्यामुळेच भानू खळदेला ही आरोपी बनविण्यात आलं असून त्यांचा शोध सुरु आहे.
भानू खळदे फरार
सध्या भानू खळदे हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. भानू खळदे यांच्या कानशिलात लगावल्यानंतर त्यांच्यामुलाने हत्या करुन घेतल्याचं समोर आल्यानंतर कट कसा रचला हे समोर आलं होतं. आवारेंचा गौरवने किशोरचा काटा काढायचं ठरवलं होतं. जानेवारी पासूनच हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती. मित्र श्यामकडून ही हत्या करुन घ्यायचं ठरलं होतं. त्यानुसार त्यांनी कट रचला होता आणि किशोर आवारेची हत्या केली होती.
का केली हत्या?
किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार केली होती, यावरुन भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी झाली होती आणि त्यावेळी आवरेंनी खळदेंच्या कानशिलात लगावली होती. जुन्या नगरपरिषदेत सर्वांसमोर झालेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी खळदे बापलेकाने किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचला आणि अखेर 12 मे रोजी कामकाज सुरू असलेल्या नगरपरिषद कार्यालयासमोरच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune Crime News : किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवं वळण; माजी नगरसेवकानेच रचला हत्येचा कट