एक्स्प्लोर

Pune Crime News : किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवं वळण; माजी नगरसेवकानेच रचला हत्येचा कट

पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांनीच बदला घेण्यासाठी या हत्येचा कट रचल्याचं तपासात समोर आलं आहे.

Kishor Aware Murder case: पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारेंच्या हत्या प्रकरणाने (Kishor Aware Murder case)आता नवं वळण घेतलं आहे. या हत्येचे मास्टरमाइंड हे त्यांच्याच समितीचे माजी नगरसेवक भानू खळदे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याआधी, माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं आणि त्यानुसार गौरव खळदे याला अटक देखील करण्यात आली. मात्र या हत्येमागे गौरवचा प्लॅन नसून खुद्द भानू खळदेचा प्लॅन असल्याची कबुली गौरव आणि इतर आरोपींनी दिली आहे. त्यानुसार आता भानू खळदे यांनाही आरोपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेसमोर जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे (Pune) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 12 मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर 7 जणांना अटक केलेली आहे, त्यांना आजा न्यायालयाने 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी

किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार केली होती, यावरुन भानू खळदे आणि किशोर आवारेंमध्ये डिसेंबर महिन्यात खडाजंगी झाली होती आणि त्यावेळी आवरेंनी खळदेंच्या कानशिलात लगावली होती. जुन्या नगरपरिषदेत सर्वांसमोर झालेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी खळदे बापलेकाने किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचला आणि अखेर 12 मे रोजी कामकाज सुरू असलेल्या नगरपरिषद कार्यालयासमोरच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 

माजी नगरसेवक भानू खळदे फरार

भानू खळदे सध्या फरार झाले असून दोन पथकं त्यांचा शोध घेत आहेत.  लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आणि त्यांची कसून चौकशी केली असता गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं तपासात समोर आलं. तिसऱ्या दिवशी गौरवला अटक केल्यानंतर पुढील चौकशीत वडील भानू खळदे हे या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी भानू खळदेंना आरोपी केलं असून त्यांचा शोध घेतला जातोय.

हेही वाचा:

Pune Crime News : धक्कादायक! जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Anjali Ambedkar: शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर
शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर
Hinjewadi Pune : पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या
पुण्याच्या आयटी नगरीत भयंकर कांड! प्रेमातील संशयाने घेतला 27 वर्षीय तरुण IT इंजिनिअरचा बळी; प्रियकराला बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget