Pune Crime News : थाटामाटात लग्न केलं नंतर पती समलैंगिक असल्याचं उघड झालं; महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्...
समलैंगिक (Gay) असल्याचं लपवून विवाह (Marriage) केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर व्यक्तीने तरुणीचा छळ केला आहे. हा प्रकार पुण्यातील वडगावशेरी परिसरात घडला आहे.
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Crime news) गुन्हेगारीसोबतच कौटुंबिक हिंसाचारातदेखील (Domestic violence) वाढ झाली आहे. त्यात मानसिक आणि शरीरिक हिंसाचार होत (Domestic violence In Pune) असल्याचं मागील दिवसातील घटनांवरुन समोर आलं आहे. मात्र आता पुण्यातून एक फसवेगिरीचा प्रकार समोर आला आहे. समलैंगिक (Gay) असल्याचं लपवून विवाह (Marriage) केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर व्यक्तीने तरुणीचा छळ केला आहे. हा प्रकार पुण्यातील वडगावशेरी (Wadgaon sheri) परिसरात घडला आहे.
विवाह करत असताना आपण समलैंगिक असल्याची बाब मुलाने लपवून विवाह केला. त्यानंतप तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. समलैंगिक असलेल्या पतीविरोधात आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सासू-सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणी ही पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहते. 2022 मध्ये तरुणीचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही नीट राहत होते. मात्र काही दिवसातच पती समलैंगिक असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने पतीला आणि त्याच्या कुटुंबियांना यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी कुटुंबियांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर मुलीचा छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर तिला विविध धमक्यादेखील दिल्या. सोबतच चारचाकी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी तिला त्रास दिला. अनेकदा धमक्या दिल्या मात्र तरीही तरुणीने सगळं सहन केलं. त्यानंतर काही दिवसांनी तिचा त्रास अनावर झाला आणि तिने चंदननगर पोलीस स्टेशन गाठलं. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना उघडपणे सांगितला. त्यानंतर पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात होत असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात कौटुंबिक हिंसाचारात चांगलीच वाढ झाल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर येत आहे. कधी पतीकडून मारहाण तर सासू सासऱ्यांकडून छळ केल्याचं समोर येतं. त्यामुळे या प्रकारच्या हिंसाचाराला आळा घालणं गरजेचं झालं आहे.
इतर महत्वाची बातमी-