एक्स्प्लोर

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय तरूणीवर RPF जवानाकडून बलात्कार, पाच दिवस डांबून केले अत्याचार

Pune Crime : प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 17  वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने बलात्कार केला आहे.

पुणे: मागील काही काळापासून राज्यातील वातावरण महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ)  एका 17 वर्षीय मुलीला  पाच दिवस डांबून  बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 17  वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने बलात्कार केला आहे.  याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा (Pune Crime News) दाखल केला आहे.  

आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण ही दहावीत शिकायला असून छत्तीसगड राज्यात कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाचा मित्राने तिला भेटून 'माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण पुण्याला जाऊन लग्न करू' अशी बतावणी केली. 12 सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station)  पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. तेथे पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व ठाकूर यांना बराच वेळ बसवून ठेवले. 

मुलीला काम करण्याच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार

 त्यानंतर आरोपी अनिल पवारने रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला आणि ठाकूर यास बंद करून टाकले आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ठाकूरला या दोघांनी सोडून दिले.  मात्र पवार आणि तिवारी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिच्यावर बलात्कार करत होते. 

दरम्यान, पीडित तरुणीच्या वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका केली. तिला परत घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना (chhattisgarh Police)  आपल्यावर घडलेली घटना सांगितली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. 

हे ही वाचा :    

Crime News : कल्याणमध्ये धावत्या कॅबमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget