(Source: Matrize)
Baramati Crime : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल, बारामती शहरातील धक्कादायक घटना
Pune Crime : महिलेच्या प्रसूतीवेळी दवाखान्यात डॉक्टर उपस्थित नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बारामतीतील डॉ. तुषार गोविंद गदादे यांच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे : बारामती शहरात धक्कादायक (Baramati) घटना घडली आहे. महिलेच्या प्रसूतीवेळी दवाखान्यात डॉक्टर (Doctor) उपस्थित नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बारामतीतील (Baramati) डॉक्टरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बारामतीतील डॉ तुषार गोविंद गदादे असे गुन्हा नोंद झालेल्या संशयित डॉक्टर आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
22 डिसेंबर 2022 रोजी पद्मिनी गोपाळ गायकवाड यांना नववा महिना चालू असल्याने गदादे डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रसूतीसाठी गायकवाड यांना हॉस्पीटलमध्ये प्रसुतीसाठी ऍडमिट करून घेतले. गायकवाड यांना ऍडमिट करून डॉक्टर बाहेर निघून गेले. त्यांचे गैरहजेरीत त्यांनी आर्हताधारक डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध ठेवले नाहीत. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भादवि का क 304 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉक्टरांचा हलगर्जीपणा...
आतापर्यंत आपण प्रसुतीदरम्यान बाळ दगावल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांवर वेगवेगळे आरोपही होताना आपण पाहिले आहे. त्यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा कायम समोर आला आहे. तरीही डॉक्टर अनेकदा आरोप फेटाळून लावतात. मात्र यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हे बाळ दगावल्याचं स्पष्ट आहे. आपल्या अनुपस्थितीत पर्यायी सोय उपलब्ध न करुन देता रुग्णालयात अनुपस्थित राहिल्याने बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांनी थेट डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबियांचा आनंद हरपला...
बारामतीतील गायकवाड कुटुंबाला मागील नऊ महिन्यांपासून बाळाची चाहूल लागली होती. हे कुटुंबीय आतुरतेने घरात दुडगुडणाऱ्या बालाची बाट बघत होतं. गदादे दाम्पत्यही आई- वडिल होण्याची स्वप्न रंगवत होते. घरात आनंद येणार होता. कुटुंबातील सगळेच बाळाच्या स्वागतासाठी मोठी तयारी करत होते. आता काही दिवसांत आणि गणपती दरम्यान घरात बाळाचं आगमन होणार होतं. मात्र डॉक्टरांच्या एका हलगर्जीपणामुळे गायकवाड कुटुंबियांवर शोककळा पसरली.
कुटुंबीय आणि नातेवाईक संतापले...
डॉक्टरांच्या या कृत्यामुळे गायकवाड कुटुंबीय आणि नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. डॉक्टरांविरोधात तातडीने तक्रार केली शिवाय त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणीदेखील कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :