एक्स्प्लोर

Pune crime: आधी स्वारगेट नंतर कात्रज बस स्टॉपवर 21 वर्षीय महिलेवर बसमध्ये अत्याचार ; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ही महिला नोकरी शोधण्यासाठी बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती.

Pune crime News: पुण्यात (Pune) एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ही महिला नोकरी शोधण्यासाठी बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी ते खोली शोधत होते. यावेळी संबंधित आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परिसरात घेऊन जात  महिलेवर बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पती वॉशरूमला जाताच त्याने हे कृत्य केले आहे.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग (वय 38) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिडित महिला पतीसोबत पुण्यात आली होती. नोकरीच्या शोधात या दोघांनी पुणे गाठलं होतं. पुण्यात  राहण्यासाठी घर शोधत होते. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग यांनी या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेले. दरम्यान पती वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपीची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला घेवून जात तिच्यावर बलात्कार केला.  त्यानंतर आरोपीने पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला.

महिलेचा पती परत आल्यानंतर त्या गाडी न दिसल्याने तो गोंधळला. सगळ्या परिसरात विचारपूस करत होता. मात्र बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी तत्काळ तसाप सुरु केला. स्वारगेट आणि कात्रज या दोन्ही परिसरात महिलेवर बलात्कार केला होता. त्यामुळे दोन्ही परिसरातील पोलीस आरोपीच्या शोधात होते अखेर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget