Pune Coronavirus Update : शाब्बास पुणेकर! कठोर निर्बंध अन् काटेकोर नियोजनामुळे पुण्यातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला
Pune Coronavirus Update : पुणे जिल्हा काही दिवसांपूर्वी केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशासाठी कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे पुण्यातील कोरोना रुग्णांचा आलेखही उतरणीला लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून पुणे जिल्हा सावरल्याचं पाहायला मिळत आहे.
Pune Coronavirus Update : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच राज्यातही कोरोना व्हायरसचं थैमान सुरु आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या आलेखामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला होता. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांसारख्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु, आता राज्यातील कोरोनाचा आलेख हळूहळू खाली येत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्हा काही दिवसांपूर्वी केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशासाठी कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे पुण्यातील कोरोना रुग्णांचा आलेखही उतरणीला लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून पुणे जिल्हा सावरल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुण्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे कोरोना रुग्णांचा आलेख आधीपासून स्थिरावण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र पुण्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
1 मे रोजी पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 96811 इतकी होती. त्यापैकी 28946 रुग्णालयात उपचार घेत होते, तर 67865 रुग्ण होम क्वॉरंटाईन होते. पण त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच, 10 मे रोजी पुण्यात कोरोनाचे 91950 रुग्ण होते. त्यापैकी 28189 रुग्ण रुग्णालयात तर, 63761 रुग्ण होम क्वॉरंटाईन होते.
मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या यादीत समावेश होणाऱ्या पुण्याचीही अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कठोर निर्बंध, कोरोना नियमांची अंमलबजावणी आणि काटेकोर नियोजनामुळे पुण्याचा चढता आलेख उतरणीला लागला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
दरम्यान, संपूर्ण देशात कोरोनानं डोकं वर काढलं होतं. अशातच संपूर्ण राज्यात नाहीतर, संपूर्ण देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याचं पाहायला मिळत होते. पण आता मात्र पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. प्रशासनाच्या वतीन लागू करण्यात आलेले निर्बंध आणि नागरिकांनी केलेली या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळेच पुणे जिल्ह्याची तब्येत हळूहळू सावरु लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :