(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Update : कोणत्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट आणि कोणत्या राज्यात वाढ? आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 13 राज्ये अशी आहेत जिथे 1 लाखाहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. 6 राज्यांमध्ये अॅक्टिव्ह केसेसची संख्या 50 हजार ते 1 लाख दरम्यान आहे. तर 17 राज्ये अशी आहेत जेथे कोरोनाचे 50 हजार पेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस आहेत.
नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती अनियंत्रित आहे, तर अनेक राज्यात परिस्थिती सुधारत आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीतही काहीशी घट दिसून आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही 26 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांहून अधिक आहे.
13 राज्यात 1 लाखाहून अधिक अॅक्टिव्ह केसेस
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 13 राज्ये अशी आहेत जिथे 1 लाखाहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. 6 राज्यांमध्ये अॅक्टिव्ह केसेसची संख्या 50 हजार ते 1 लाख दरम्यान आहे. तर 17 राज्ये अशी आहेत जेथे कोरोनाच्या 50 हजार पेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस आहेत. भारतात 82.75 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 1.09 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 40, 956 रुग्णांची नोंद, तर 71,966 रुग्ण कोरोनामुक्त
अनेक राज्यांमध्ये कोरोना आकडेवारीत घट
कोरोनामुळे बर्याच राज्यात परिस्थिती अतिवाईट बनली आहे. तर काही राज्यांमध्ये परिस्थिती आधीपेक्षा सुधारत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरातमध्येही दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबारमध्येही रोजची कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
बर्याच राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ
बर्याच राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वरच्या बाजूस चढत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात दररोज नवीन प्रकरणे वाढत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर
गेल्या 24 तासात 3,29,942 रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 29 हजार 942 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 3876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत 2 लाख 49 हजार 992 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 3 लाख 56 हजार 082 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.