Goa Lockdown : गोव्यात जाणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य
मुंबई-गोवा महामार्गावरून रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर पत्रादेवीमध्ये गोवा पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करून सोडत आहे. तर कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोवा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
गोवा : तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लान केला असेल तर तुम्हाला कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र बरोबर ठेवावं लागणार आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर गोव्यात प्रवेश करता येणार नाही, असे आदेश गोवा सरकारने काढले आहेत. मात्र आपण गोव्याचे रहिवाशी असाल तर त्याचा पुरावा देऊन तुम्ही गोवा राज्यात प्रवेश करू शकता. तसेच तुम्ही एखाद्या कामाकरता गोव्यात जात असाल तर त्या संबंधित कार्यालयाचे पत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. मेडिकल इमर्जन्सीमध्ये मात्र या प्रमाणपत्राची गरज असणार नाही. रस्ते आणि रेल्वे मार्गाने गोव्यात जाताना हे नियम लावण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोवा प्रशासनाने हे आदेश काढले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरून रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर पत्रादेवीमध्ये गोवा पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करून सोडत आहे. तर कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोवा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल स्वतः जवळ बाळगणं आवश्यक आहे. गोवा प्रशासनाने गोव्यांच्या रहिवाशांना, गोव्यात कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या व्यक्तिंना आवश्यकतेनुसार या बंधनांमधून सूट दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गाने गोव्यात येणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या 72 तासांच्या आत केलेला आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करायचा आहे. गोव्यातील रहिवासी असलेल्यांना वास्तव्याच्या पुराव्याच्या आधारे, गोव्याला कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे आणि गोव्यात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णाला वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आवश्यकतेनुसार या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Update : कोणत्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट आणि कोणत्या राज्यात वाढ? आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
- नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर
- कोकणातील या ठिकाणी लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती; पोलिसांनी केला हस्तक्षेप!
- Telangana lockdown update | तेलंगणात उद्यापासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, काय सुरु, काय बंद?