एक्स्प्लोर

Pune Bypoll Election : भाजपच्या नाराजी नाट्याचा फायदा महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांना होणार?

भाजपाच सुरु असलेल्या नाराजी नाट्याचा फायदा महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरांना होण्याची शक्यता आहे.

Pune Bypoll election : कसबा पोटनिवडणूक  (Pune Bypoll Election) जाहीर झाल्यापासून भाजपात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. आधी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केलेली असताना आता गिरीश बापट आणि भाजप नेते संजय काकडे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दोघेही निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय दिसत नाही आहे. शिवाय खासदार गिरीश बापट यांनी प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर ते प्रचारात सहभागी होणार आहे. भाजपमध्ये धुसफुस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. भाजपात सुरू असलेल्या या नाराजी नाट्याचा फायदा महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) होण्याची शक्यता आहे.

निवडणूक जाहीर झाल्यावर टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक या दोघांपैकी उमेदवार असेल अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपने ऐनवेळी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. पोटनिवडणुकीत उमेदवारी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिली जाते, अशी आतापर्यंतची प्रथा आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोधदेखील होते. मात्र भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यानंतर टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 

त्यानंतर गिरीश बापट यांनी कालच आजापणाचं कारण देत प्रचारातून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी पत्रक काढून यासंदर्भात महिती दिली होती. त्यानंतर कसब्यात मागील चाळीस वर्ष सत्ता गाजवलेले गिरीश बापट भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाचं पाचवेळा प्रतिनिधित्व केलंय. यावेळी गिरीश बापट हे स्नुषा स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते, मात्र ती मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर बापट यांनी प्रचारातून माघार घेतली असेल अशा चर्चा झाल्या.  मात्र काल पुन्हा एकदा भाजपनं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा बापटांची भेट घेतली आणि सकाळी बापटांनी मैदानात उतरण्याता निर्णय घेतला.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजप नेते संजय काकडे यांना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा झाली होती. शिवाय हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे यांचा फोटो नव्हता. तसेच, अर्ज भरण्याच्या वेळी भाजपकडून जो मेसेज पाठवण्यात आला होता. त्यातही त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे त्यांना डावलल्या जात आहे, अशा चर्चा होत्या. त्यांचीही मनधरणी फडवणीसांनी केली आणि त्यानंतर त्यांनी कामानिमित्त बाहेर होतो, आता प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं. 

भाजपच्या पुण्यातील या प्रमुख नेत्यांची नाराजी भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे. शिवाय या सगळ्या नाराजी नाट्याचा फायदा विरोधी उमेदवार रविंद्र धंगेकरांना होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune Bypoll Election : किंगमेकर अॅक्शन मोडवर! गिरीश बापटांची आधी प्रचारातून माघार फडणवीसांच्या भेटीनंतर थेट मैदानात उतरणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget