(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Navle Bridge Accident : पुण्यात दोन विचित्र अपघात; नवले पुलावर टॅंकरची पाच-सहा वाहनांना धडक तर नवी पेठेत स्कूल बसने कारचा चिरडलं!
पुणे : पुण्यातील नवले पुलावरील अपघात संपायचं नाव घेत नाही आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रॅंकरने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची ही घटना घडली आहे.
पुणे : पुण्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. पुण्यात दोन विचित्र अपघात घडले आहे. पहिला अपघात नवले (Pune Navale Bridge Accident) पुलावर झाला आहे तर दुसरा अपघात हा नवी (Pune Accident) पेठेतील पत्रकार संघासमोर झाला आहे. दोन्ही अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातांमुळे पत्रकार संघासमोर मोठी वाहतूक कोंडी झाली तर नवले पुलावरील अपघातामुळे काही वेळ वाहतूक थांबवावी लागली आहे.
नवले पुलावर टँकरची पाच-सहा वाहनांना धडक
पुण्यातील नवले पुलावरील अपघात संपायचं नाव घेत नाही आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रॅंकरने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची ही घटना घडली आहे. या अपघातात अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामुळे एका बाजूने नवले पुलावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली आहे. अपघात पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. अपघातामुळे नवले पूल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताचं कारण अजून समोर आलं नाही आहे. या पुलावर विचित्र स्लोप असल्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नवी पेठेत स्कूल बसने तीन वाहनांना
त्यासोबतच पुण्यातील नवी पेठेत असलेल्या पत्रकार संघासमोर विचित्र अपघाताची घटना घडली आहे. शालेय वाहतुकीच्या स्कूल बसने तीन वाहनांना उडवलं. यात तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामुळे महत्वाचा असलेल्या नवीपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत दोन रिक्षा चालक एकमेकांना धडकल्याने रिक्षाचंही मोठं नुकसान झालं आहे. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली.
दोन्ही अपघातात गाड्यांचं नुकसान
या दोन्ही अपघातात गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. काही गाड्यांना समोरुन धडक लागली आहे तर काही गाड्यांना मागच्या बाजूस जोरदार धडक लागली आहे. स्कूलबसचंदेखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र या दोन्ही अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
नवले पूल बदनाम
पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.
इतर महत्वाची बातमी-