एक्स्प्लोर
पुण्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करुन हत्या
पीडिता दुपारी एक वाजताच घरी आली. तिचा धाकटा भाऊ संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी आला, तेव्हा त्याला बहीण बेडवर निपचित पडल्याचं आढळून आलं.

पुणे : पुण्यात 17 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. धायरी परिसरातील राहत्या घरी गळा आवळून तिला जीवे मारण्यात आलं. धाकटा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मयत तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. धायरी परिसरात ती आई, वडील आणि छोट्या भावासह राहत होती. धाकटा भाऊ आठवीत शिकतो.
सर्व कुटुंबीय गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते. त्यानंतर पीडिता दुपारी एक वाजताच घरी आली, असं पोलिसांनी सांगितलं. तिचा धाकटा भाऊ संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी आला, तेव्हा त्याला बहीण बेडवर निपचित पडल्याचं आढळून आलं. त्याने आई-वडिलांना याविषयी कळवलं. त्यांनी डॉक्टरांना बोलवलं असता तरुणीला मृत घोषित करण्यात आलं.
ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करुन नंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. त्यानुसार सिंहगड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
