एक्स्प्लोर
पुण्यात पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे: पुण्यातील तळेगावमधील एका पोलीस हवालदारानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय लक्ष्मण लाम्बकाने असं या पोलीस हवालदाराचं नाव असल्याचं समजतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय लाम्बकाने हे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मागील दोन दिवसांपासून संजय यांच्या घराचा दरवाजा बंद होता. दोन दिवस दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांना थोडी शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना पाचारण केले. तेव्हा आज सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
संजय यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली यांचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कोणतीही सुसाइड नोटही सापडलेली नाही. पण मागील काही दिवस ते रजेवर असल्याची माहिती समजते आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement