Pune Corona Vacination Update 2022: कोरोना लसीकरण जलद करण्यासाठी PMC ची 'व्हॅक्सीन ऑन व्हील्स' मोहीम; 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्राधान्य
पुणे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी पुणे महापालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे.12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरणासाठी पुण्यात 'व्हॅक्सीन ऑन व्हील्स' ही मोहीम राबवण्यात येत आहे.
Pune Corona Vacination Update 2022: पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मुलांचे मोफत लसीकरण खासगी आणि मनपा शाळांमध्ये 'व्हॅक्सीन ऑन व्हील्स' द्वारे करण्यात येणार आहे अशी घोषणा पुणे महानगरपालिकेने केली आहे. यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. 12 ते 14 वयोगटातील पालकांनी आपल्या पाल्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असं आवाहनही पुणे महानागरपालिकेने पुणेकरांना केले आहे.
कृपया आपल्या १२ ते १४ वयोगटातील पालकांनी आपल्या पाल्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.#PMC #PuneVaccination #VaccineOnWheels pic.twitter.com/91agLQCQp7
— PMC Care (@PMCPune) June 20, 2022">
पुणे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी आणि वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेनं (PMC) एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी पुण्यात 'व्हॅक्सीन ऑन व्हील्स' ही मोहीम राबवण्यात येत आहे. लसीकरणासाठी 15 मार्च 2010 वा त्यापूर्वी जन्मलेले सर्व लाभार्थी पात्र असतील.
कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी 'व्हॅक्सीन ऑन व्हील्स' राबविण्यात येत आहे. यामध्ये 12 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी लाभाथ्यांकडे आधारकार्ड / ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यांचं पहिला डोस आणि दुसरा डोस असलेल्यांचं फार कमी प्रमाणात लसीकरण झालं आहे.18 वर्षांवरील पात्र नागरिकांच्या तुलनेत 12 ते 17 या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झालं आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून ही योजना आखण्यात आली आहे. यात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमी असल्याचंही सांगण्यात येत आहे.
कोरोनापासून थोडा दिलासा
भारतात गेल्या काही आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे. आता याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशातल मागील 24 तासांत 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 8 हजार 537 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.61 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के इतका झाला आहे.