एक्स्प्लोर

Pune Traffic Diversion : पुणेकरांनो मोदींच्या सभेला जाताय; पार्किंगची व्यवस्था पाहून जा, नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकाल!

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीतदेखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. त्यासोबतच पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही जर मोदींच्यासभेसाठी जाणार असाल तर गाडी पार्किंगची व्यवस्था नेमकी कुठे आहे?,

पुणे : पुण्यात आज पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Sabha ) भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी भाजपकडून सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी वाहतुकीतदेखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. त्यासोबतच पार्किंगचीदेखील (Traffic Diversion And Partking) व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही जर मोदींच्यासभेसाठी जाणार असाल तर गाडी पार्किंगची व्यवस्था नेमकी कुठे आहे?, हे पाहूनच घराबाहेर पहा. 

कुठे आहे पार्किंगची व्यवस्था?

-पुणे-सोलापूर रस्ता, सासवड रस्त्याने पुण्याकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाचालकांनी भैरोबानाला चौक ते वानवडी बाजार चौकीदरम्यान वाहने लावावीत.

 -वानवडी बाजार ते लष्कर भागातील मम्मादेवी चौक दरम्यान वाहनचालकांनी वाहने लावावीत. नगर, पिंपरी-चिंचवड भागातून सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊस, मोरओढा चौक, वॉर मेमोरिअल चौक ते घोरपडी गाव, घोरपडी रेल्वे गेट, आर्मी पब्लिक स्कूल येथे वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 -सातारा, सिंहगड रस्ता, स्वारगेट भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी बेऊर रस्ता चौक, लष्कर भागातील कोयाजी रस्ता, अंतर्गत रस्ते, तीन तोफा चौक (हॉटेल डायमंड क्वीन परिसर, लष्कर भाग), बिशप स्कूल परिसरात वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 -खासगी बस लावण्याची सुविधा हडपसर भागातील रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे

 -भैरोबा नाला ते आर्मी पब्लिक स्कूल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सभेसाठी मोठी गर्दी होणार, पर्यायी मार्गाचा वापर करा!

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, कोरेगाव पार्क परिसरात, मुंढवा ताडीगुत्ता चौक परिसरातील वाहतुकीचा वेग संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सोमवारी दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

मोदींच्या सभेच्या निमित्ताने जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सोलापूर रस्ता, थेऊर फाटा, सासवड रस्ता, मंतरवाडी फाटा, बोपदेव घाट रस्ता, खडी मशीन चौक, सातारा रस्ता, कात्रज चौक, सिंहगड रस्ता, वडगाव पूल, पौड रस्ता, चांदणी चौक, बाणेर रस्ता, औंध रस्ता, राजीव गांधी पूल, जुना मुंबई-पुणे महामार्ग, हॅरिस पूल, आळंदी रस्ता, लोहगाव रस्ता, नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

इतर महत्वाची बातमी-

PM Modi in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे वाहतुकीत बदल, हे रस्ते राहणार बंद

PM Narendra Modi Pagadi : चांदीच्या कोयऱ्या अन् डायमंडचा सूर्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यात खास 'दिग्विजय योद्धा पगडी'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : धनंजय मुंडे राजीनामा देणार? करुणा शर्माचा दावा खरा ठरणार?Zero Hour Sangli Palika : सांगलीकरांवर करांचा बोजा, सांगली महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget