एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रेमप्रकरणातून नगरसेविकेच्या कुटुंबियांची तरुणीच्या कुटुंबाला मारहाण
संगीता यांचा मुलगा ओंकार आणि लेंडघर यांच्या मुलीचे वर्ष भरापूर्वी प्रेम संबंध जुळले. याची कल्पना लेंडघर कुटुंबियांना लागताच, बिरदवडे कुटुंबियांच्या कानावर ही बाब घालण्यात आली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणावरुन वर्षभर सुरु असलेल्या धुसफूसीवरुन नगरसेविकेच्या कुटुंबाने एका घरात घुसून मारहाण केली. तसंच घरातील साहित्याचीही तोडफोड केली. चाकणच्या रानूबाईमळ्यात ही घटना मंगळवारी रात्री घडली.
संगीता बिरदवडे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचं नाव आहे. त्यांचे पती माजी सरपंच दत्ता बिरदवडेही यात सामील होते. बिरदवडे कुटुंबीयांनी लेंडघर कुटुंबियांवर हा हल्ला केला.
संगीता यांचा मुलगा ओंकार आणि लेंडघर यांच्या मुलीचे वर्ष भरापूर्वी प्रेम संबंध जुळले. याची कल्पना लेंडघर कुटुंबियांना लागताच, बिरदवडे कुटुंबियांच्या कानावर ही बाब घालण्यात आली. मात्र तरीही प्रेमप्रकरण सुरुच राहिलं. अधे-मधे दोन्ही कुटुंबातील मुलांची चकमक कायम होत होती.
त्यातच मंगळवारी संध्याकाळी सात वाजता संगीता यांचा मुलगा ओंकारने प्रतीक लेंडघरला दुचाकीवरुन कट मारला. तेव्हा दोघे तिथेच भिडले. ओंकारने घडला प्रकार घरी सांगताच, बिरदवडे कुटुंबीय लेंडघर यांच्या घरात घुसले आणि त्यांना मारहाण केली. घरातील साहित्याची, घराबाहेर उभी असलेली चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
या प्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement