एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे विद्यापीठाचा इंजिनिअरिंगचा पेपर फुटल्याची अफवाच!
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा बुधवारी असलेला इंजिनीअरिंग मेकॅनिक्स हा पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे आली होती.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा बुधवारी झालेला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा पेपर फुटला नसल्याचं परीक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झालं आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केल्याची शक्यता असून आवश्यकता असल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसंच यामध्ये एमआयटी महाविद्यालयाकडून हलगर्जीपाणा झाला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल, असं विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा बुधवारी असलेला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे आली होती. एमआयटी कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्याचं तक्रारदारांचं म्हणणं होतं. याबाबत माहिती घेण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आपलं पथक एमआयटी महाविद्यालयात पाठवलं. या पथकाने केलेल्या चौकशीत असं आढळलं की, हा पेपर फुटलेला नाही. परीक्षा दहा वाजता सुरु झाल्यानंतर कोणीतरी मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर पाठवून दिले. त्यानंतर हे पेपर व्हायरल झाले. त्यानंतर पेपर फुटल्याची अफवा पसरली.
पुणे विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पेपर फुटला
या संदर्भात खोडसाळपणा करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं विद्यापीठाने ठरवलं आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास पोलिसांमध्ये तक्रार देणार असून खोडसाळपणा करणाऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. तसंच याबाबत महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल.
काही क्लासचालकांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पेपर फुटल्याच्या नावाखाली तीन प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. त्यापैकी दोन प्रश्नपत्रिका 2014 आणि 2017 या वर्षातील म्हणजे जुन्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिसरी प्रश्नपत्रिका बुधवारी झालेल्या पेपरची होती. त्यावर वॉटरमार्क आहेत. त्यावरुन हा पेपर कॉलेजने परीक्षेपूर्वी केवळ अर्धा तास आधी डाऊनलोड केल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर हे पेपर विद्यार्थ्यांना वर्गात पेपर लिहिण्यासाठी दिले जातात. त्यामुळे हा पेपर परीक्षेला दिल्यानंतर मगच कोणीतरी खोडसाळपण करुन तो बाहेर पाठवला, असं विद्यापीठाच्या पथकाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement