Panvel-Nanded Train : पनवेल-नांदेड ट्रेनमध्ये झुरळांचा सुळसुळाट, पुणे स्टेशनवर दोन तासांपासून ट्रेन थांबून, प्रवासी आक्रमक
pune station : पनवेल ते नांदेंड ट्रेनमधील एसी बोगीमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळे असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.
![Panvel-Nanded Train : पनवेल-नांदेड ट्रेनमध्ये झुरळांचा सुळसुळाट, पुणे स्टेशनवर दोन तासांपासून ट्रेन थांबून, प्रवासी आक्रमक Panvel To Nanded Train 17613 pune station cockroach ac coach in train latest marathi news udpate Panvel-Nanded Train : पनवेल-नांदेड ट्रेनमध्ये झुरळांचा सुळसुळाट, पुणे स्टेशनवर दोन तासांपासून ट्रेन थांबून, प्रवासी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/05/ceae115c96a83b00d3e466190f78a9241691250391136265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Panvel To Nanded Train 17613 : पनवेलवरुन नांदेडला जाणाऱ्या ट्रेनमध्ये झुरळांचा सुळसुळाट असल्याचे समोर आलेय. यामुळे मागील दोन ते तीन तासांपासून ट्रेन पुणे स्थानकात (pune station) थांबून आहे. जोपर्यंत झुरळांचा बंदोबस्त केला जाणार नाही, तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. ट्रेनमधील एसी बोगीमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळे असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ट्रेन पुणे स्टेशनला आल्यानंतर प्रवासी आक्रमक झाले. त्यांनी ट्रेन पुढे न जाऊ देण्यासाठी आंदोलनच पुकारले. रेल्वे कर्मचारी आणि टीसी प्रवाशांची समजूत काढण्यासाठी ट्रेनमध्ये दाखल झाले, पण प्रवाशांनी त्यांना प्रतिप्रश्न करत आधी झुरळांचा बंदोबस्त करा, असे सांगितले.
पनवेल ते नांदेड (panvel to nanded train 17613) ही रेल्वे प्रवाशांनी मागील दोन तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरली आहे. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झाले आहे. पनवेल आणि मधल्या स्थानकांवर रेल्वेत बसलेले प्रवासी या झुरळांच्या सुळसुळाटामुळे हैराण झाले आहे. झुरळांचा बंदोबस्त झाल्याशिवाय रेल्वे पुढे न्यायची नाही, अशी प्रवाशांची भूमिकाय. या रेल्वेला पुढे नांदेडला जायचय.
पनवेलवरुन दुपारी चार वाजता नांदेडला जाणारी ट्रेन निघाली. पण थोडं अंतर पार केल्यानंतर एसी बोगीमधील प्रवाशांना झुरळांचा त्रास होऊ लागला. बोगीमध्ये जिकडे तिकडे झुरळेच दिसत होती. बर्थवर, लोकांच्या कपड्यावर, टॉयलेटमध्ये... ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. महागाचे तिकिट काढलण्यानंतरही प्रवाशांना सुविधा व्यवस्थित न मिळाल्यामुळे सर्वांनी आक्रमक रुप घेतले. लोकांनी ट्रेन पुणे स्टेशनपासून पुढे जाऊ न देण्याचा निर्णय घेतला. टीसी आणि रेल्वे कर्मचारी समजूत काढण्यासाठी आले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
एसीबी बोगीमधील झुरळांच्या सुळसुळाटाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. काही प्रवाशांनी सोशल मीडियावरुनही संताप व्यक्त केलाय. व्हिडीओमध्ये सगळीकडे झुरळेच दिसत आहे. झुरळांमुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण झालेय. लहान मुले रडताना ऐकू येत आहे. प्रवासी कैलास मंडलापुरे यांनी ट्रेनमधील प्रवासात झालेल्या त्रासाबद्दल एबीपी माझाला सांगितलं. ते पनवेलवरुन नांदेडला निघाले आहेत. ते म्हणाले की, या ट्रेनमध्ये फक्त आणि फक्त झुरळे आहेत. प्रवाशांच्या अंगावर आणि सामानावरही झुरळे आली आहेत. ही झुरळांची ट्रेन आहे का? ट्रेनमधून लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीही प्रवास करत आहेत. त्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणताही कारवाई केली जात नाही. ही ट्रेन मागील दोन तासांपासून पुणे स्थानकावरच आहे. रेल्वेकडून झुरळांवर कोणताही उपाययोजना केली जात नाही. हे दुर्देवी आहे.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)