(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lokmanya Tilak Award : मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधीपक्षांचा विरोध; अलका चौकात दाखवणार काळे झेंडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोधीपक्षीयांनी विरोध केला आहे. अलका टॉकीज चौकात ते काळे झेंडे दाखवणार आहे
Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 1 ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या (Lokmanya Tilak Award) उपस्थितीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते रोहित टिळक हा पुरस्कार ज्या संस्थेकडून दिला जातो त्या संस्थेचे विश्वस्त आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी मोदींना पुरस्कार देण्यास विरोध करायचं ठरवलं आहे. त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे.
डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून अलका चौकात मोदींना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये विरोधीपक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहणार असले तरी त्यांच्या पक्षांचे नेते त्याचवेळी मोदींच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
पुणे शहरामध्ये दरवर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. लोकमान्य टिळकांचा इतिहास स्वातंत्र्य काळाच्या आगोदरपासून हा काँग्रेसच्या विचारसरणीशी जोडलेला आहे. असं असताना देखील आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी डॉ. रोहित टिळक यांच्याकडून नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषणा करण्यात आली आहे. त्यांची आणि लोकमान्यांनी विचारसरणी जुळत नाही त्यामुळे या पुरस्काराला विरोध करणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं.
शरद पवार उपस्थित राहणार; रोहित टिळक यांचा दावा
1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचं रोहित टिळकांनी सांगितलं आणि ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत.
मोदींच्या स्वागतासाठी तयारी जोरात...
पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या मार्गिकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. ते पुण्यात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली जात आहे. त्यांच्या सभेसाठी पुण्यातील स.प. महाविद्यालयात भव्य मंडप उभारण्यात येत आहे. पावसाळा असल्याने हा मंडप संपूर्ण बंद असणार आहे. त्यासोबतच त्यांच्या संरक्षणासाठी देखील मोठी तयारी करण्यात येत आहे.
हेही वाचा-
Pune ATS News : बॉम्ब कसा बनवतात? दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली हाताने लिहिलेली चिठ्ठी