एक्स्प्लोर

निर्भयाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू; अजित पवारांचे मावळमधील पीडितेच्या कुटुंबीयांना आश्वासन 

Pune News Update : मावळमधील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वकील देऊ आणि नराधमाला मरेपर्यंत  फाशी होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.

Pune News Update : पुण्याच्या (Pune) मावळ (Maval) तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबाची आज विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी निर्भया आणि कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. 

अजित पवार म्हणाले, "विरोधी पक्षनेता म्हणून मला इथं यावं लागलं हे माझं दुर्देव समजतो. निर्भयाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंब हतबल झालय. निर्भया आणि संशयित आरोपी दोघेही  एकाच गावातील असल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. कोवळ्या वयात निर्भयावर जे अत्याचार झाले हे खरच वाईट घटना आहे. या घटनेचा निषेध करतो. येणाऱ्या अधिवेशनात संपूर्ण सभागृहाच्या वतीने हा मुद्दा मांडेन. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्यासाठी प्रयत्न करेन. 

नराधमाला फाशी देण्यासाठी प्रयत्न करेन
अजित पवार म्हणाले, या प्रकरणी वकील देऊ आणि नराधमाला मरेपर्यंत  फाशी होईल यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे प्रयत्न करेन. आर्थिक मदतीने निर्भया परत येणार नाही, मात्र कुटुंबाला हातभार लावायला हवा. अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून कठोरात कठोर शासन करायला हवं. नंतर कोणी अशी हिंमत करता कामा नये." 

"माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. कसं काय लोक असे धाडस करतात, हे मनाला पटतच नाही. मी जास्त काही बोलत नाही. पण तुम्हाला पुढं बऱ्याच गोष्टी कारवाईतून घडताना दिसतील.
 या नराधमाणे याआधी ही असं धाडस केलं होतं. तेंव्हा तुम्ही ग्रामस्थांनी ही बाब गुपित ठेवायला नको होती. तेंव्हाच या नराधमाला आपण ठेचले असते तर कदाचित ही घटना पुढं घडली नसती. आता तर ग्रामस्थांनी जागृत रहायला हवं, असे अजित पवार म्हणाले. 
 
महत्वाच्या बातम्या

Maval Murder : लैंगिक अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपी तेजस दळवीच्या आईला देखील अटक 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सदुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यूSuresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
Embed widget