एक्स्प्लोर

BARTI : अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक, NSFDC शिष्टमंडळाची बार्टी संस्थेस भेट

NSFDC Delegation Visit BARTI Pune : एनएसएफडीसी आणि बार्टी लवकरच एकत्रितपणे काम करणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ भारत सरकारच्या (NSFDC) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (BARTI) भेट दिली. या शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार जेनेव, मुख्य महाव्यवस्थापक सी. रमेश राव, चर्मोद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा एनएसएफडीसीचे सदस्य धम्मज्योती गजभिये यांचा समावेश होता.

बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भारताचे संविधान, 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. श्री. गजभिये यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बार्टीच्यावतीने अभिनंदन करून  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

सुनील वारे यांनी शिष्टमंडळास बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये बार्टीतर्फे भारताचे संविधान, महापुरुषांच्या जीवनावरील पुस्तकांचे अल्प दरात वितरण, कौशल्य विकास, युपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस परीक्षांचे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ देशातील अनुसूचित जातीच्या विकासासाठी महामंडळांना निधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असल्याचे सांगून  जेनेव म्हणाले, महामंडळ कौशल्य विकास प्रशिक्षण, फेलोशिप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन आदी क्षेत्रात देशभर कार्य करत आहे. बार्टी ही अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असल्याचे सांगून त्यांनी बार्टीच्या कामांची प्रशंसा केली. बार्टीसारख्या संस्था देशातील अन्य राज्यात उभारण्यात याव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

गजभिये म्हणाले, अनुसूचित जातीच्या प्रत्येक प्रश्नावर काम करण्याची क्षमता बार्टी संस्थेमध्ये आहे. बार्टी संस्थेचा महासंचालक म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने एनएसएफडीसीचा सदस्य म्हणून बार्टी संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

एनएसएफडीसी आणि बार्टी लवकरच एकत्रितपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिष्टमंडळाने बार्टी ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख रविन्द्र कदम, वृषाली शिंदे, शुभांगी पाटील यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget