एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतल्या सिल्व्हर ओकनंतर काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव
मुंबईतल्या सिल्व्हर ओकनंतर काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकनंतर आता बारामती येथील गोविंदबागेतही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय.
बारामती : मुंबईतल्या सिल्व्हर ओकनंतर काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मुंबई येथील पवारांचे निवास्थान सिल्व्हर ओकवर बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय आज ही संख्या 473 झाली असून 500च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गोविंद बागेतील जवळपास 50 कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी आज 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सिल्व्हर ओकवरील बारा जणांना कोरोना, पाच शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक
दरम्यान, पवार नियमितपणे बारामती निवासस्थानी येत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा बारामतीत दौरा होता. मात्र, तो अचानक रद्द झाला होता. सध्या प्रशासनाच्या वतीने प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, त्याचा आढावा घेतला आहे.
शरद पवार यांची टेस्ट निगेटिव्ह
मंत्री बाळासाहेब पाटील पॉझिटिव्ह आल्यानंतर कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात हे कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. वरळी डोम इथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता महापालिका सिल्वर ओक परिसरात फिव्हर कॅम्प घेणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे. दरम्यान कराड दौऱ्यानंतर हे सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पण त्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान 16 ऑगस्टला शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.
#Coronavirus | शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, गोविंदबागमधील 4 जणांना कोरोनाची लागण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement