एक्स्प्लोर

Dengue day 2024 : डासांचा बंदोबस्त करा अन् डेंग्यू टाळा; आरोग्य विभागाचे आवाहन

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे : डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी ( Dengue)साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने 16 मे  रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्यानिमित्ताने केले आहे.डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे. एक दिवस कोरडा पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.  डेंग्यूचे रूग्ण नियमित स्वरूपात आढळत असून डेंग्यू आजाराच्या संख्येत ऑगस्ट, सप्टेंबर नंतर वाढ होताना दिसते. काही भागात अतिपाऊस, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकासकामे अशा अनेक कारणांमुळे डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढते. 

अशा कराव्यात उपाययोजना


डेंग्यू डासांची उत्पत्ती साठविलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण कमी होईल. यासाठी घराजवळ असलेले नाले वाहते करून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. तसेच नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावेत, पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे, घरातील कुलर, फ्रीजचा डीप पॅन नियमित स्वच्छ करावा, गटारी वाहती करावीत व छोटे खड्डे, डबकी बुजवावीत, अंगभर कपडे घालावेत, झोपताना मच्छरदानीचा व डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.

आजारांची  लक्षणे

तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रित काळसर संडास होणी ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. अशी काही लक्षणे आढळल्यास नजीकच्या जिल्हा सामान्य रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून मोफत रक्त तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी एलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी एनआयव्ही पुणे व महानगरपालिकेतील सेंटिनल येथे मोफत केली जाते.डेंग्यू हा आजार नागरिकांच्या सहकार्याशिवाय रोखता येणे शक्य नसल्याने यामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असून डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. राधाकिशन पवार यांनी कले आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोरमधील होर्डिंग मृत्यूकांडातील बचावकार्य तब्बल 63 तासांनी संपलं; 16 जणांचा मृत्यू, 75 जखमी

बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget