एक्स्प्लोर

Narendra Dabholkar Case : मारेकरी पुलावर कसे पोहोचले अन् नरेंद्र दाभोलकरांची हत्या कशी केली? असा होता घटनाक्रम...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरु आहे. दाभोलकरांची हत्या कशी केली हे न्यायालयात सांगितलं आहे.

Narendra Dabholkar Case :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Case ) यांच्या हत्येचा खटला पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरु आहे.  सनातन संस्थेच्या पाच जणांविरुद्ध याबाबत आरोप निश्चित करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस.आर. सिंग यांनी न्यायालयात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी दाभोलकरांची हत्या कशी केली हे न्यायालयात सांगितलं आहे.

कसा होता घटनाक्रम?

1- 20 जून 2013  औरंगाबादहून मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकात पोहोचले. तिथून ते शनिवार पेठेतील एका घरात आले.  तिथे एक मोटार सायकल त्यांच्यासाठी तैनात ठेवण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ज्या इमारतीत राहायचे तिथली पाहणी केली. साधना मीडिया सेंटरच्या समोरच ही इमारत आहे. या इमारतीतून डॉक्टर दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि पाठोपाठ त्यांचे मारेकरीही निघाले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पुण्यातील या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. त्यांचे मारेकरी पाठोपाठ या शनिवार पेठ पोलीस चौकीसमोर येऊन दबा धरुन बसले. डॉक्टर दाभोलकर या पुलावरुन परत जाण्याची ते वाट बघत होते. 

सफाई कामगारांची साक्ष महत्वाची ठरली...

डॉक्टर दाभोलकर पुलावर आले होते त्यानंतर मारेकरी  सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पुढे सरसावले आणि त्यांनी डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आणि लगेचच ते मोटर सायकलवरुन पसार झाले. पण हे सगळं सकाळच्या वेळी इथे स्वच्छता करणाऱ्या दोन सफाई कामगारांनी पाहिलं आणि त्यांची या प्रकरणातील साक्षच या प्रकरणात निर्णायक ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर, विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आलेत. 

शिक्षा कधी होणार?

माजी सीबीआय ऑफिसर एस आर सिंग यांनी हत्येच्या दिवशीचा दिनक्रम मांडला. डॉ. विरेंद्र सिंह तावडे आणि दाभोळकर यांच्यात वैचारिक मतभेद होते, असं त्यांनी सांगितलं.  डॉक्टर दाभोलकरांची हत्या होऊन जवळपास दहा वर्षं उलटली आहेत. या दहा वर्षांत फक्त आरोपींना पकडून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्यामुळेच हा खटला चालून त्याचा निकाल लागून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार?हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखतJustice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Embed widget