एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?

Maharashtra Assembly Winter Session 2024 : मविआत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले असल्याचे चित्र आज बघायला मिळाले आहे.

Uddhav Thackeray नागपूरमाजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Maharashtra Assembly Winter Session 2024) नागपुरात हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर मात्र काही वेळातच उद्धव ठाकरे हे पुत्र आदित्य आणि काही आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचले. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील ठाकरे पिता-पुत्रांनी भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 

उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्याशी न बोलता निघून गेले?

अशातच, मविआत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्याचे उद्धव ठाकरे यांनी टाळले असल्याचे चित्र आज बघायला मिळाले आहे. नाना पटोले यांच्या समोरून उद्धव ठाकरे विधिमंडळातून बाहेर पडले. मात्र उद्धव ठाकरेंनी नाना पटोले यांच्याशी न बोलता निघून गेले. नाना पटोले विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयासमोर उभे होते. दरम्यान, 10 फूट अंतरावरून उद्धव ठाकरे विधिमंडळातून बाहेर पडले. मात्र ही भेट अनावधानाने टळली की मुद्दाम हे झाले, याची चर्चा आता रंगू लागली आहे. आज सभागृहात पण काँग्रेसच्या सभात्याग वेळी ठाकरे गटाचे आमदार सभागृहात थांबले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत सारे आलबेल तर नाही ना, असेही बोलल्या जात आहे.

मित्रपक्ष काँग्रेस उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकणार का?

काँग्रेसने सावरकर आणि भाजपने नेहरूंबद्दल बोलणे सोडायला हवे, मोदींनी नेहरू यांचे रडगाणे बंद करावी, तर  काँग्रेसने सावरकरांवर बोलणे सोडावे. मुळात भाजपने सावरकर यांना भारत रत्न का जाहीर केला नाही? फडणवीस यांना अनेक वेळा पत्र दिले, मग अजून मान्यता का मिळाली नाही? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आपापल्या जागी आहेत. आता आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवलं पाहिजे. मुळात सावरकरांना भारतीय जनता पक्ष भारतरत्न का देत नाही? त्यांची हरकत काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळेस उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Maharashtra Assembly Winter Session 2024) नागपुरात हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते बोलत होते. 

आम्हाला भूतकाळातल्या घटनेवर बोलायचे नाही- नाना पटोले 

दरम्यान, सावरकरांवरून उद्धव ठाकरेंनी मित्रपक्ष काँग्रेसला दिलेल्या सल्लावर काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता ते म्हणाली की,  सध्या वर्तमानच धोक्यात आहे. त्यामुळे आम्हाला भूतकाळातल्या घटनेवर बोलायचे नाही. आमच्यासाठी परभणी, बीड, शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जो सल्ला दिला त्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. असे म्हणत नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले आहे. 

हेही वाचा

Video: बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीत नेमकं काय घडलं?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई

व्हिडीओ

Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन; गल्लीबाहेर नाकाबंदी, तर 50पेक्षा अधिक घरांची झडती
Maharashtra Live blog updates: पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन; गल्लीबाहेर नाकाबंदी, तर 50पेक्षा अधिक घरांची झडती
Mumbai Crime News : सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
Embed widget