Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Australia vs India : बुमराहसह आकाश दीप सिंगने तडाखेबाज फलंदाजी केली. या खेळीमुळे द्रविड आणि लक्ष्मण हे अत्यानंदी झालेच असतील, पण त्यांचीही आठवण या निमित्ताने भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना झाली असेल.
Australia vs India, 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात संघाने फॉलोऑन वाचवला. गब्बा मैदानावर गेल्या चार दिवसांत नाणेफेक जिंकण्याव्यतिरिक्त काहीही टीम इंडियाच्या बाजूने काहीच झालं नाही. खेळाच्या चौथ्या दिवशीही शेवटची आशा म्हणून क्रीजवर उभा असलेला रवींद्र जडेजा बाद झाला तेव्हाही या सामन्यात टीम इंडियासाठी काही उरले नाही असे वाटत होते, मात्र जसप्रीत बुमराहसह आकाश दीप सिंगने तडाखेबाज फलंदाजी केली. या खेळीमुळे राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे अत्यानंदी झालेच असतील, पण त्यांचीही आठवण या निमित्ताने भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना झाली असेल.
तेव्हा फॉलोऑन असतानाही टीम इंडियाने 171 धावांनी सामना जिंकला
टीम इंडियासाठी गाबामध्ये बुमराह आणि आकाश दीप यांच्यात 39 धावांची भागीदारी झाली होती. या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. असेच काहीसे द्रविड आणि लक्ष्मण यांनी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलकाता कसोटीत केले होते, जेव्हा या दोघांनी टीम इंडियासाठी 376 धावांची विक्रमी भागीदारी केली आणि फॉलोऑन असतानाही टीम इंडियाने 171 धावांनी सामना जिंकला.
भारताविरुद्धच्या या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ असहाय्य दिसत होता. गाबा कसोटीत भारताच्या 213 धावांच्या स्कोअरसमोर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स घेतल्या होत्या. इथून टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 32 धावांची गरज होती, पण दिवसाचा खेळ संपेपर्यंत बुमराह आणि आकाशने मिळून फॉलोऑन वाचवून पराभव तर टाळलाच शिवाय सामना अनिर्णितेतही बदलला. 2001 मध्ये कोलकाता कसोटी सामन्यातही असाच प्रकार घडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 171 धावा करता आल्या, त्यामुळे त्यांना फॉलोऑन खेळावा लागला. यानंतर दुसऱ्या डावात राहुल द्रविडच्या 180 धावा आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 281 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 657 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले, त्याला प्रत्युत्तर म्हणून ते 212 धावांवरच मर्यादित राहिले आणि त्यामुळे भारताने या सामन्यात ऐतिहासिक विजय संपादन केला.
इतर महत्वाच्या बातम्या