एक्स्प्लोर

Santosh Deshmukh VIDEO : आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता एक नवीन व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये आरोपी आणि पोलिस निरीक्षक यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं दिसतंय. 

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पहिल्यापासूनच केला जातोय. आता त्याला पाठबळ देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांपैकी एक आरोपी सुदर्शन घुले याने निलंबित PSI राजेश पाटील यांची आदल्यादिवशी एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून त्याच्या दुसऱ्या दिवशीच संतोष देशमुखांची हत्या झाली होती. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळेच संतोषची हत्या झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. त्याच अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले. 

पोलिसांना हत्येच्या नियोजनाबद्दल आधीच माहिती होतं का? 

पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत विहार या उडप्पी हॉटेलमध्ये भेटले होते. हा व्हिडीओ 8 डिसेंबर, संध्याकाळी 5.18 वाजताचा आहे. यावेळी आरोपी आणि पोलिस अधिकाऱ्यामध्ये काहीवेळ चर्चाही झाल्याचं दिसतंय. त्याच्याच दुसऱ्या दिवशी, 9 डिसेंबर रोजी दुपारी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. 

आरोपी आणि पोलिस उपनिरीक्षकामध्ये नेमकी काय चर्चा झाली? पोलिस अधिकारी राजेश पाटीलला या हत्येप्रकरणी आधीच माहिती होतं का? या प्रश्नांची उत्तरं आता या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी करतील.  

पोलिस निरीक्षक सक्तीच्या रजेवर, PSI निलंबित

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तर पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे. या दोघांनीही या प्रकरणात वेळकाढूपणा केल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग आढळला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहे. 

ही बातमी वाचा : 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Scam : नीट पेपरफुटी प्रकरणाची पुणे, लातूरसह बीडमध्ये मोठी कारवाई, मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कारवाईचे संकेत, CBI कडून विद्यार्थीसह अनेकांच्या चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणाची पुणे, लातूरसह बीडमध्ये मोठी कारवाई, मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कारवाईचे संकेत, सीबीआयकडून विद्यार्थीसह अनेकांच्या चौकशी
Beed Crime Walmik Karad: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
मोठी बातमी: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
Beed News: कमरेला बिसलरीची रिकामी बाटली; सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना दिसला अन्...; बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुलतज्ञ विभाग प्रमुखांचा तलावात बुडून मृत्यू
कमरेला बिसलरीची रिकामी बाटली; सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना दिसला अन्...; बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुलतज्ञ विभाग प्रमुखांचा तलावात बुडून मृत्यू
Dhananjay Munde meet Devendra Fadnavis: परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Donald Trump: अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
बिग ब्रेकिंग! अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Rahul Gandhi and PM Modi: भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची बोचरी टीका
भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची बोचरी टीका
Embed widget