Chhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!
Chhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर आज छगन भुजबळ यांनी येवल्यातील (Yeola) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे. येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला. 160 किलोमिटर लांबून पाणी आणलं. मला मते देतील असे वाटत होते. मात्र काही मंडळी चक्करमध्ये पडली. मला कोणाबद्दल अजिबात राग नाही. पाण्याचा प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही, तो पूर्ण करायचा आहे. ज्यांनी मते दिली नाही त्यांनाही अजून जास्त पाणी द्यायचे आहे, तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्यायचे आहे. आपल्याला एकत्रित काम करायचे आहे. नगर परिषद, जिल्हा, पंचायत समिती यात आपण आपली ताकद दाखवून देणार आहे, असे त्यांनी म्हटले.