एक्स्प्लोर

बळीराजाच्या आयुष्याचं बजेट कोलमडलंय... नानांचं भावनिक आवाहन

एक तोची नाना या कार्यक्रमात समीरण वाळवेकर यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी नानांनी शेतकऱ्यांपासून राजकारण, अशा विविध विषयांवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे : कांद्याचा दर थोडा वाढला की लगेच बजेट कोलमडलं. अहो एखाद्या महिन्याचं तुमचं बजेट पडलं तर काय फरक पडतो, त्या बळीराजाच्या आयुष्याचं बजेट कोलमडलंय त्याचा विचार करा थोडासा. मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता. नका करू त्या भाजीचे मोल, या भावना आहेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या. एक तोची नाना, या कार्यक्रमात समीरण वाळवेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानांनी शेतकऱ्यापासून राजकारणापर्यंत चौफेर फटकेबाजी केली. सुरुवातीच्या काळात अशोक सराफ मला खूप मदत करायचे. माझ्याकडे पैसे नसायचे म्हणून या ना त्या कारणाने ते आर्थिक मदत करायचे. कधीकधी मी त्यांचे हात-पाय चेपायचो म्हणून ते पाच रुपये द्यायचे. आज ही अशोक सराफ भेटले की मी हात-पाय दाबतो आणि ते दहा रुपये देतात. म्हणतात असू दे महागाई वाढलीये. अपमान आणि भूक हे दोन माझे गुरू आहेत. कारण हे दोन्ही गुरू आयुष्य शिकवतात. त्यांनी मला घडवलंय, असं सांगत नानांनी आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडून दाखवला. 'नाना'चा नेने कधी झाला कळलं नाही - या कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षितची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन देत नाना म्हणाले, 'कैसे बताऊ मै तुम्हे, तुम मेरे लिए कोण हो, या वाक्यानेच सभागृहात प्रेक्षकांचा टाळ्या पडल्या. त्यावर नाना मिश्किलपणे म्हणाले, आता फक्त आठवणीत जगायचं. कारण न चा काना डोक्यावर गेला आणि ती नेने सोबत गेली. सर्वच पक्षाची नियमावली चांगली पण.. सर्वच पक्षांची नियमावली चांगली आहे. फक्त त्याची अंमलबजावणी आणि पायमल्ली हाच फरक. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाची नियमावली चांगली असल्याचे मत नानांनी व्यक्त करत विजयबाई हा पक्ष मला मिळाला म्हणून मी घडलो असल्याचे सांगितले. ते दिवस माझ्या आयुष्यात महत्वाचे होते. यावेळी रंगभूमीवर पुन्हा येण्याचे नानांनी संकेत दिले. नाटकात कदाचित पुन्हा येईन, बॅरिस्टर जगायची इच्छा आहे. त्यासाठी विक्रमशी बोललो असून आणखी प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप कमी झाल्या - काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे नानांनी सांगितले. मात्र, कांद्याचा दर थोडा वाढला की लगेच बजेट कोलमडल्याचं सांगितलं जातं. अहो एखाद्या महिन्याचं तुमचं बजेट पडलं तर काय फरक पडतो, त्या बळीराजाचे आयुष्याचं बजेट कोलमडलंय त्याचा विचार करा थोडासा. मॉल मध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता. नका करू त्या भाजीचे मोल, असं आवाहन यावेळी नानांनी केलं. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार माझे हिरो - नाना शरद पवार माझे हिरो होते. मी त्यांना बोललो होतो, आपण राजकारणातले चाणक्य आहात, असंच असायला हवं. फक्त दुर्दैव्य इतकंच की आपण एकही चंद्रगुप्त तयार नाही केलात. पण नंतर लक्षात आलं की चाणक्य ही तेच चंद्रगुप्त तेच असल्याची टिपण्णी नानांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी देखील नानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार मला माणूस म्हणून आवडतो. बाकीच्या विषयात मला पडायचं नाही. आपण एकदा आपलं म्हटलं की म्हटलं, असा टोला नानांनी लगावला. यावेळी ओम भूर भुवा स्वाहा आणि बिस्मिल्लाह हिर्र रहमान निर रहीम हे एकच असल्याचं सांगत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. नानांच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे - सरकार बद्दल ओरडण्यापेक्षा आपण स्वतः करायला हवं. घरसमोरचा खड्डा आपण स्वतः बुजवायला हवा. नुसतं खड्डे-खड्डे ओरडून फायदा नाही. मी प्रत्येक पक्षाला उद्देशून बोलतोय, कोणी मनावर घेऊ नये. निवडणुकीपूरतं राजकीय पक्षाची ओळख असते, सत्तेत आल्यानंतर ती ओळख नसते, तेव्हा ते सत्ताधारी, सरकार म्हणून ओळखले जातात. तेव्हा तुम्ही आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण करायला हवीत. आम्हाला हमीभाव द्या, मग आम्ही कशाला तुमच्या नावाने ओरडू. कोकणात मी तुम्हाला काही मागणार नाही आणि मी तुम्हाला काही देणार नाही, अशी प्रथा. ही प्रथा बदलायला हवी. पाच वर्षाने आपल्याला मतदान करण्याचा हक्क मिळतो. मात्र, आपण त्या अधिकाराचे धिंडवडे काढतो. कारण आपण फक्त मत देतो, पण त्यांना प्रश्न विचारत नाही. राजकारणात येण्याची मला ऑफर आली होती. पण माझा तो पिंड नाही. कारण तिथं गेलो तर कोणकोणत्या पक्षात जायचं. पुढे पक्षच उरायचे नाहीत, शेवटी मी एकटाच राहायचो. वेलकम चित्रपटामुळं लहान मुलं माझ्याजवळ आली. अमित शहांनी माझं एक काम पटकन केलं. चांगल्या कामाची ओळख झाली की मग कोणत्याही पक्षाचा असो तो आपली चांगली कामं करतोच. उद्धव ही माझा, शरदराव ही माझेच, देवेंद्र ही माझाच, योग्य पैसे दिले तर तू ही माझाच.(माझ्या चित्रपटात काम करा अशी ऑफर देणाऱ्याला उद्देशून) Nana Patekar Nagpur | नागपुरात नाना पाटेकरांच्या हस्ते उद्योजिका मेळाव्याचं उद्घाटन | नागपूर | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget