एक्स्प्लोर

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, डिव्हाईडरचा रॉड कारच्या आरपार घुसला

Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) आणखी एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. डिव्हाईडरचा (Divider) अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला. मात्र म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, अगदी त्याच्याच प्रत्यय या प्रसंगी ही आला. अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतून प्रवास करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल असंच मनात येतं. पण सुदैवाने तिघांच्या मधून डिव्हायडरचा रॉड आरपार गेला. या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे, त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

हा अपघात आज (18 मार्च) साडे सातच्या सुमारास सोमाटणे फाट्यावर झाला. मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट अशा पद्धतीने डिव्हाईडरमध्ये घुसली. या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कालही अपघात

दरम्यान काल (17 मार्च) याच परिसरात कारने ट्रकला मागून धडक दिली होती. अर्धी कार ट्रक खाली अडकल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. उर्से टोलनाक्याजवळ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीने यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

द्रुतगती मार्गावरील अपघातांची संख्या वाढतीच

मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो. मात्र या मार्गावर अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

संबंधित बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs LSG : ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
Sharad Pawar : मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jitendra Awhad Full Speech Raigad : दादागिरी सहन करणार नाही, काय व्हायचं ते होऊन जाऊद्याABP Majha Headlines : 09 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde On Congress : काँग्रेसने 50 ते 60 वर्षांचा हिशेब द्यावा, मुख्यमंत्री शिंदेंचा सवालSatej Patil On Dhananjay mahadik : रात्री बारा वाजताही मी काठी घेऊन उभा! सतेज पाटलांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs LSG : ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
ऋतुराजचं धमाकेदार शतक, दुबेचं अर्धशतकी खेळी; लखनौला 211 धावांचं आव्हान
Sharad Pawar : मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष, म्हणून आता हिंदू- मुस्लिम केलं जातंय; शरद पवारांचा हल्लाबोल
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं
अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं
Web Series : 'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज
'Aarya' ते 'Criminal Justice'; हॉटस्टारवर नक्की पाहा 'या' थरार, नाट्य असणाऱ्या धमाकेदार वेबसीरिज
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे 'हे' आहेत 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक; 'धक धक गर्ल'चे फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही!
माधुरी दीक्षितचे 'हे' आहेत 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक; 'धक धक गर्ल'चे फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही!
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Embed widget