एक्स्प्लोर

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गोंधळ दूर, अजितदादांनी भर सभेतच विषय केला क्लियर!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते पुण्यातील बारामती येथे एका सभेला संबोधित करत होते.

पुणे : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चर्चा आहे. या योजनेसाठी महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, महिलांना हा अर्ज भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच सरकारने या योजनेत आतापर्यंत अनेकवेळा महत्त्वाचे बदल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भर सभेत या योजनेबाबत असाच एक गोंधळ दूर केला आहे. त्यांनी कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल, याबाबत सांगितलं आहे. 

अजित पवार सभेत नेमकं काय म्हणाले? 

अजित पवार आज (14 जुलै) बारामतीच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका सभेला संबोधित केले. भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या अनेक योजनांचा उल्लेख करत महिला, शेतकऱ्यांसाठी सरकार खूप काही करत असल्याचा दावा केला. याच आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. "आम्ही लाकडी बहीण योजना आणली. या योजनेवरून काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली. परंतु मी त्याला फार महत्त्व दिले नाही. महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मी असेल, ही योजना आपण प्रभावीपणे राबवू शकतो, असा मला विश्वास होता. या योजनेच्या माध्यमातून मला गरीब महिलेला, माताले, माझ्या मुलीला मला मदत करायची होती. या योजनेसाठी आपण 1 जुलैला काम सुरू केलेलं आहे. मला उभ्या महाराष्ट्रातील महिलांना सांगायचं आहे की, महिलांनी अर्ज करावा तो वेळेत मंजूर करण्याची काळजी आम्ही घेऊ," असे अजित पवार यांनी सांगितले. 

ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये

"महिलांनी मला सांगितलं की या योजनेसाठीच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. मग सरकारने पिवळे, केशरी रेशनकार्ड मंजूर केले. महिलांना त्रास कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेतला. या योजनेतून साधारण अडीच कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतील," अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच ऑक्टोबर महिन्यात रक्षाबंधन आहे. या महिन्यात माझ्या भगिनीच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली.   

अजित पवार यांनी गोंधळ दूर केला

मला एक महिला विचारत होती की चारचाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही का? मी म्हणालो की ट्रॅक्टर असलं तरी लाभ मिळेल. परत ती महिला मला म्हणाली की माझे पती ड्रायव्हर आहेत. ते रात्री गाडी घेऊन घरी येतात. मग ती गाडी आमचीच समजतील. त्यात माझी काय चूक आहे. पण मी तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नींना सांगतो की स्वत:च्या नावावार चारचाकी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार नाही. जे ड्रायव्हर आहेत, त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा :

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवा जीआर, केला 'हा' मोठा बदल!

लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे? तिसरी अट वाचा मगच करा सही; अन्यथा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 16 March 2025Beed Teacher Post :  ३ वर्षांच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाने संपवलं जीवन.. मन सुन्न करणारी ती पोस्ट समोरSanjay Raut On BJP :  मोदी-शाह देशाचे दोन तुकडे करुन जातील, खासदार संजय राऊतांची रोखठोक टीकाABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
भारी मिस्टेक हो गया... पुण्यात चूक; पतित पावन संघटनेकडून औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफारांचा फोटो जाळला
भारी मिस्टेक हो गया... पुण्यात चूक; पतित पावन संघटनेकडून औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफारांचा फोटो जाळला
बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
Embed widget