एक्स्प्लोर

राज्यात मान्सूनचं आगमन! गोवा, दक्षिण कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात हजेरी

सर्वजण वाट पाहत असलेला मान्सून अखेर आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली.

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे थांबलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. आगामी चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला. पुढील चार दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत मान्सूनयोग्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा परिसरात पुढील पाच दिवस चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात आजपासून हळूहळू पावसाचा जोर वाढेल. 12 जून ते 15 जूनच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल. तर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

भिवंडी, परभणी, हिंगोलीसह काही जिल्ह्यात रात्रभर पाऊस; नदी खळखळली, ओढे-नाले भरले

तळकोकणात पावसाची दमदार हजेरी तळकोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यात तासभर मुसळधार पाऊस सुरु होता. जिल्ह्यात आतापर्यंत 288 मी.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे.

बंगालची खाडी सक्रिय बंगालच्या खाडीत लवकरच एक निम्न दबावाचं क्षेत्र निर्माण होत आहे. सध्या बंगालच्या खाडीचं मध्य-पूर्व आणि त्याजवळच असलेल्या बांगलादेश तसंच म्यानमारच्या किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाच्या वाऱ्याचं क्षेत्र निर्माण झालं आहे. वातावरणाची परिस्थिती आणि सागरी परिस्थितीमुळे असे संकेत मिळत आहेत की, लवकरच या क्षेत्राचं रुपांतर निम्न दबावच्या क्षेत्रात होईल. अशीच परिस्थिती राहिली तर देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो.

जूनमध्ये सामान्यपेक्षा 71% जास्त पाऊस पूर्वोत्तर भारतात मान्सूनचा वेग काहीसा धीमा आहे. परंतु 3 ते 4 दिवस उशीर हे सामान्यच समजलं जातं. याचदरम्यान पूर्वोत्तर भारताच्या काही भागांसह कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा तसंच आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थितीत निर्माण झाली आहे. जूनमध्ये देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71% अधिक पडला आहे. यात सर्वाधिक योगदान मध्य भारत आणि केरळचं आहे.

Nisarga Cyclone Effect | रत्नागिरीला 'निसर्ग'चा तडाखा, अनेकांचा संसार उघड्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget