एक्स्प्लोर

सरकारने परवानगी दिली तर येत्या 100 दिवसात पुण्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करु; मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता

पुण्यातील कोरोनाची आतापर्यंतची स्थिती लक्षात घेता कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवणे हाच कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे असं सुधीर मेहता म्हणाले. 

पुणे : सरकारने परवानगी दिली तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून येत्या 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण केले जाऊ शकतं, त्या संबंधी सर्व तयारी आमच्याकडे आहे अशी माहिती मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी दिली आहे. त्यांनी तसे एक ट्वीट केलं आहे.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी पुण्यातील कोरानाच्या लसीकरणासंबंधी आपल्या काही योजना मांडल्या आहेत. ते म्हणाले की, "कोरोनाच्या लसीकरणाचा खर्च  हा आरटीपीसीआर चाचणीच्या एक चतुर्थांश आहे. आपण जर पुण्यात दर दिवशी एक लाख लोकांना कोरोनाची लस दिली तर येत्या दोन महिन्यात पुण्यातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल. पुण्यातल्या लसीकरणाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडे सर्व सुविधा उपलब्ध असून त्या संबंधी प्लॅनही तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अशी परवानगी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सला मिळाली तर ही जबाबदारी पार पाडायला आम्ही समर्थ आहोत."

सुधीर मेहता  पुढे म्हणाले की, "पुण्याची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे. त्यामध्ये जवळपास 33 लाख लोकसंख्या ही 20 वर्षाच्या आतील आहे. त्यामुळे त्या वरील असणारी 42 लाख लोकसंख्येचे लसीकरण करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन असे 84 लाख कोरोनाचे डोस आवश्यक आहेत. पण आमचा अनुभव असा सांगतोय की यापैकी केवळ 60 ते 65 टक्के लोकसंख्येला सध्या कोरोनाच्या लसीची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 25 लाख लोकसंख्या आणि त्यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस इतके ध्येय साध्य झाले तरीही सर्व पुण्याचे लसीकरण होईल." 

सुधीर मेहता यांनी पुण्यातील कोरोना लसीसंबंधी काही योजना मांडल्या आहेत. ते म्हणतात की या 25 लाख लोकसंख्येपैकी 10 लाख लोकसंख्या ही 40 वर्षावरील आहे आणि 15 लाख लोकसंख्या ही 20 ते 40 वर्षामधील आहे. यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस द्यायचे तर खालील तीन प्रकारे ते देता येतील. 
1. दर दिवशी 25 हजार डोस असे 200 दिवस,
2. दर दिवशी 50 हजार डोस असे 100 दिवस
3. दर दिवशी 75 हजार डोस असे 70 दिवस

या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करायची झाल्यास सर्व प्रशासन आणि हॉस्पिटल्सना त्याची तयारी करवी लागेल. येत्या 100 दिवसात पुण्यातील नागरिकांचे लसीकरण करायचे असेल तर केंद्र सरकारने पुण्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस उपलब्ध करुन द्यावेत. पुण्यातल्या कोरोनाची स्थिती, आतापर्यंतचे कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू लक्षात घेता पुण्यातील कोरोनाच्या लसीकरणाचा वेग विशेष वाढवावा लागेल. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाच्या लसीकरणाचा वेग त्याहून जास्त वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे असंही ते म्हणाले.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget