एक्स्प्लोर

Eknath Shinde & Sharad Pawar: शरद पवारांचं एकनाथ शिंदेच्या दिल्ली भेटीविषयी गूढ वाढवणारं वक्तव्य, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Eknath Shinde & Sharad Pawar: एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी उलथापालथ होणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत मोदी आणि शाह यांना भेटले होते.

Eknath Shinde & Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले होते. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्लीवारीची प्रचंड चर्चा झाली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे  यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल, असे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. एकनाथ शिंदे हे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवणारी भूमिका घेणार का, याचीही चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, शरद पवार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकास यांची आहे. मी दिल्लीत कुठे गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे. मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. आमची वाटचाल सरळ आहे, आम्ही कधीच तिरकस जात नाही. 

Sharad Pawar on PM Modi: शरद पवारांचं पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीविषयी महत्त्वाचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या काही दिवसांत वयाची पंचाहत्तरी ओलांडणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियमाप्रमाणे निवृत्त होणार का, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी म्हटले की, आरएसएस ही एक शिस्तबद्ध संघटना आहे. एकदा निर्णय झाला तर त्याची चर्चा होत नाही, अंमलबजावणी होत असते. 75 वर्षे निवृत्ती वयाच्या बाबतीत शिस्तीचे पालन होईल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar on Ajit Pawar: अजितदादांसोबत एकत्र येणार का? शरद पवार म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आम्ही विचारांसोबत जातो. भाजपसोबत कुणी जात असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नाही.  आमच्याकडे दुसऱ्या फळीतील सर्वजण पक्षाला मजबूत करण्यासाठी सक्षम आहेत. कुणीच कमजोर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक.... फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्या

माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget