एक्स्प्लोर

Dadar Kabutar Khana: भसाभसा धान्य खाणारे ते थवे कबुतरांचे नव्हे तर पारव्यांचे, मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक का?

Dadar Kabutar Khana: रानटी पारव्यांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे गंभीर आजार होतात. त्यामुळे कबुतरखान्यांवर बंदी आणली असली तरी जैनधर्मीयांकडून विरोध सुरु आहे.

Dadar Kabutar Khana: मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरून सध्या वाद सुरु आहे . मात्र भूतदया म्हणून ज्यांना धान्य खायला घातलं जात ती कबुतरे नसून पारवे आहेत . या पारव्यांची संख्या मुंबईतच नव्हे तर पुणे (Pune News) आणि इतर शहरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची वाढली आहे . हे पारवे मानवाला तर धोकादायक आहेतच त्याचबरोबर त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळं निसर्गातील समतोल बिघडून चिमण्या (Sparrow) आणि इतर पक्षी नाहीसे झालेत . पारवे (Parve) आणि कबुतरं यांच्यात नक्की काय फरक आहे हे आधी लक्षात घेतले पाहिजे.

सध्या कबुतरांना खायला घालण्यावरून जो वाद सुरु आहे तो फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही . पुणे असेल किंवा अन्य शहरं अनेक ठिकाणी पक्षांना खायला घालण्यावरून संघर्ष पाहायला मिळतो आहे . पण असं खायला घालणाऱ्यांना हे कितपत ठाऊक आहे की ज्यांना ते दाणे टाकतायत ती कबुतरं नाहीत तर आरोग्याला हानिकारक असे पारवे आहेत. पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात हे पारवे अक्षरश: हजारोंच्या संख्येने पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना खायला घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे .

मुंबईतील 51 कबुतरखाने बंद करण्यावरून सध्या मोठा वाद सुरु आहे . पण फक्त मुंबईच नाही तर पुणे आणि इतर शहरांमध्ये देखील हे पारवे संघर्षाचं कारण बनले आहेत. या पारव्यांमुळे फुफ्फुसांचे अनेक गंभीर आजार उद्भवत असल्यानं मुंबई प्रमाणे पुण्यात देखील या पारव्यांना दाणे टाकण्यास बंदी आहे . तरीही पुण्याच्या नदी पात्रात हजारोंच्या संख्येत पारवे आढळून येत आहेत. पुण्यातील नारायण पेठेतील दोघांचा या पारव्यांमुळे आजारी पडून मृत्यू झाल्याचं स्थानिकांचं म्हणणे आहे.

Pune News: पुण्यातही रानटी पारव्यांचा त्रास

या पारव्यांना कोणी खायला टाकू नये यासाठी पुणे महापालिकेकडून आरोग्य निरीक्षक नदी पात्रात तैनात करण्यात आलेत . कोणी दाणे टाकताना आढळल्यास त्याला पाचशे रुपये दंड ठोठावला जातोय . मात्र, तरीही या पारव्यांना पोत्याने दाणे टाकले जात आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वाढत्या शहरीकरणामध्ये सगळीकडे सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्यात . त्यामुळं एकीकडे चिमण्यांसारखे पक्षी नाहीसे होत गेलेत . मात्र पारवे इमारतीला लागून असलेल्या प्लास्टिकच्या ड्रेनेज पाईपमध्ये हे घरटं करत असल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढलीय . या पारव्यांच्या विष्ठेतून श्वसनाचे अनेक गंभीर आजार उद्भवतायत असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

दुसरीकडे जी खरी कबुतरं आहेत, ती मात्र या पारव्यांमुळे नाहक बदनाम होत आहेत . या कबुतरांच्या थव्यांना ढाबळ असं म्हटलं जात . अशा ढाबळी पुण्यात मोठ्या संख्येने आहेत . या ढाबळीमध्ये पांढरी , बदामी , हिरवी , निळ्या रंगाची , वेगवगेळ्या छटा असलेली सुंदर कबुतरं पाहायला मिळतात . रंगवरूनच या कबुतरांची नावंही ठरतात . पाचशे रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत या कबुतरांची त्यांच्या सौदर्यांवरुन किंमत ठरते. एकीकडे पारवे हे रानटी आहेत , तर कबुतरं पाळीव आहेत . पारवे कुठेही घरटं करतात तर कबुतरं मालकासोबत एकनिष्ठ असतात . कितीही दूर गेली तरी ती मालकाकडे परत येतात .

Pune Piegons: कबुतर आणि पारव्यांमध्ये नक्की फरक काय?

कबुतर हा पूर्वीपासून मानवाचा विश्वासू पक्षी राहिलाय . पूर्वीच्या काळी संदेश एका ठिकाणावरून दुसरीकडे पाठ्वण्यासाठी कबुतरांचा उपयोग केला जायचा . आज देखील ही कबुतरं शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मालकाकडे परत येतात असं या ढाबळ मालकांचं म्हणणंय . पुण्यातून सातारच नव्हे तर चेन्नई पर्यंतचा प्रवास या कबुतरांनी केल्याचं या ढाबळ मालकांचं म्हणणे आहे.

पुण्य गाठीशी बांधण्यासाठी पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांनी पारवे आणि कबुतरं यांच्यातील हा फरक समजून घेणायची गरज आहे . पक्ष्यांबद्दल भूतदया दाखवणाऱ्यांनी या पारव्यांचा मानवाला किती त्रास होतोय, याची जाणीव ठेवण्याची गरज आहे . पुण्याचा बॅलन्स वाढावा यासाठी कबुतर म्हणून पारव्यांना खायला घातलं जातंय आणि त्यामुळं ही सुंदर कबुतरं नाहक बदनाम होतायत . दुसरीकडे या पारव्यांची संख्या इतकी वाढलीय की निसर्गातील समतोल बिघडलाय, चिमण्यांसारखे पक्षी नाहीसे होतायत , मानवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पारव्यांना खायला घालणाऱ्यांनी थोडीशी भूतदया मानवासाठी देखील राखून ठेवायला हवी.

आणखी वाचा

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार, मनीषा कायंदे भडकल्या, म्हणाल्या, 'यांचा इगो हर्ट...'

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget