एक्स्प्लोर

शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे समर्थक शरणू हांडे यांचे अपहरण करत मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Sharanu Hande kidnapping case Solapur : अक्कलकोट रोड इथं आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे समर्थक शरणू हांडे (Sharanu Hande) याचं पांढऱ्या रंगाच्या कारमधून येऊन चार जणांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. कारमधून उतरुन हांडे यांना हॉकी स्टिकसह अन्य शस्त्राने मारहाण केली आहे. जीवे मारण्याच्या हेतूने शरणू हांडेंना गाडीत बसवण्यात असल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत आरोपींचे वकील अॅड शरद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एफआयआर करण्यासाठी सात तासाचा अवधी का लागला? असा सवाल अॅड शरद पाटील यांनी केला आहे. 

याप्रकरणी सोलापूर न्यायालयात चार आरोपींना हजर करण्यात आलं होतं. यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वापरलेली गाडी मालकाचे आणि यातील गुन्ह्यातील हत्यारे कोणती याची चौकशीसाठी सात दिवसाचे रिमांड मागितलं होतं. 
एफआयआर करण्यासाठी सात तासाचा अवधी का लागला?  असा सवाल अॅड शरद पाटील यांनी केला आहे. आज न्यायालयासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे.

आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी 

दरम्यान, शरणु हांडे अपहरण प्रकरणात अटक आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शरणू हांडे अपहरण प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून दोन्ही आरोपीन इंडी तालूक्यातील निंबाळ गावातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शरणु हांडे अपहरण प्रकरणात या आधीचं चौघांना न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आता राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांनाही न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

रोहित पवार बालिश माणूस, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

शरणू हांडे प्रकरणात मी आरोप केले नाहीत. ज्या कार्यकर्त्याचे अपहरण केले त्याने सगळी माहिती सांगितल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. रोहित पवार बालिश माणूस आहे. मी बोलतो आणि महाराष्ट्रात वातावरण निर्मिती होते. मंत्र्यांनी बोलणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी बोलत राहावं. नेता होण्याची त्यांना घाई झाली आहे. कुठला विषय कुठे फिरवणे हे रोहित पवारांनी थांबवले पाहिजे असे पडळकर म्हणाले.  

राज्यातील सरकार गेल्यामुळे रोहित पवार हतबल 

ज्या भाजप नेते माऊली हळणवर यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी आरोप केले त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांचा राज्यातील सरकार गेल्यामुळे हतबल झाले आहेत. अत्यंत घाबरलेले आहेत. परवा त्यांची कुठेतरी चौकशी देखील झालेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरणु हांडे कार्यकर्त्याला भेट दिली तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाचा आला हे सांगितले आहे. मी शरणू हांडेंकडे नंतर गेलो कारण तो माझा जिवाभावाचा मित्र आहे. त्याची प्रकृती विचारण्यासाठी, खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे का? हे विचारण्यासाठी मी तिथे गेलो होतो असे माऊली हळणवर म्हणाले. 

रोहित पवारचा गैरसमज झालेला आहे किंवा त्यांनी करुन घेतलेला आहे. वाळूच्या बाबतीत त्यांनी दुसरा आरोप केला. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी मला एक एफ आय आर दाखवावी. माझ्यावर 30 ते 35 गुन्हे दाखल आहेत, त्याचा मला अभिमान आहे. त्यापैकी एकही गुन्हा माझ्यावर चोरी, दरोडा, मारामारी अशा प्रकारचा नाही. माझ्यावर शेतकरी आणि चळवळीच्या आंदोलनाचे गुन्हे आहेत. जेजुरीमध्ये पडळकर यांनी एक आंदोलन केलं होतं त्यामधला दोन नंबरचा मी आरोपी आहे.  विठ्ठल मंदिर उघडा म्हणून तुमचं सरकार असताना बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं, त्यामधला मी चार नंबरचा आरोपी आहे. राजू शेट्टी,  सदाभाऊ खोत यांच्या चळवळीमध्ये मी अनेक वर्ष काम केलं आहे. शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत. रोहित पवार तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहात. मी चळवळीतून संघर्ष करत पुढे आलो आहे. अनेक वेळा जेलमध्ये बसत या ठिकाणी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतोय असे माऊली हळणवर म्हणाले. माझे तुम्हाला आवाहन आहे कोणतेही बेछूट आरोप तुम्ही करू नका. कारण तुम्ही घाबरलेले आहात. अनेक बहुजनांच्या नेत्यावरती तुम्ही प्रिप्लान करून बदनाम करण्याचा प्रयत्न करताय असे हळणवर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Solapur Crime News: शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोघांना कर्नाटकातील इंडी भागातून घेतलं ताब्यात; गुन्ह्यातील सहभाग...

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Embed widget