(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News: ‘नो-एंट्री’ वरुन झाला वाद; तरुणांने केली थेट पोलिसांना धक्काबुक्की
‘नो-एंट्री’वरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार वानवडी परिसरात समोर आला आहे. यावरुन धक्काबुक्की केलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी अटक केली.
Pune Crime News: ‘नो-एंट्री’वरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार वानवडी परिसरात समोर आला आहे. यावरुन धक्काबुक्की केलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गोळीबार मैदानाजवळ घडली आहे. 26 वर्षीय शफाक अश्फाक शेख असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी असलेल्या अमर साळवे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
साळवे हे गोळीबार मैदानाजवळील परिसरात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी त्यांनी नो एंट्रीवरून दुचाकीवरून आलेल्या शफाकची चौकशी केली. चौकशी सुरू असताना संतापलेल्या शफाकने साळवे यांना शिवीगाळ करत लाथा मारल्या आणि मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय संतोष गायकवाड करीत आहेत.
पुण्यात अनेक ठिकाणी नो एंन्ट्री आहे. नो एंन्ट्री असलेल्या ठिकाणी कायम ट्राफिक पोलीस उभे असतात. अनेक दुचाकी स्वारांना अडवतात. दुचाकीस्वार अनेकदा पोलिसांना वाईट शब्दात बोलून निघून जातात. मात्र यावेळी थेट पोलिसांवरच धक्काबुक्की करण्यात आली आहे. वानवडीच्याआधी देखील पुण्याच्या काही परिसरात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे तरुणांना कसलाच धाक उरला नाही, असं चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.
गाडी अडवून ट्राफिक पोलिसांनी कागदपत्रांबाबत विचारपूस करताच त्याने चाकू काढला आणि....
औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील सेव्हनहीलवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेव्हनहील चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आले आहे. एका विना नंबर दुचाकीला अडवून कागदपत्रांबाबत विचारपूस करताच त्या मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाने खिशातील चाकू काढून पोलिसांना दाखवत धमकावले. मोहमद सिद्दीकी खालेद चाउस ( वय-32 वर्ष रा. सईदा कॉलणी जटवाडा रोड औरंगाबाद, आणि सय्यदि सलमान सय्यद सउद ( वय-22 वर्ष रा. गल्ली नं. 3 रहिमनगर औरंगाबाद) असे आरोपींचे नाव आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.