एक्स्प्लोर

Maratha Reservation प्रश्नी दोन्ही राजे एकत्र, संभाजीराजे-उदयनराजे यांची पुण्यात बैठक सुरु

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे चर्चेसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्यात पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर एकत्रित पत्रकार परिषद होणार असून मराठा आरक्षणावर त्यांची आपापली भूमिका मांडतील.

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दोन्ही राजे एकत्र येणार का अशी चर्चा रंगली असतानाच, दोन्ही राजेंची भेट झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरी ही भेट होत आहे. या भेटीनंतर दोन्ही राजे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर आपापली बाजू मांडणार आहेत. राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आज दोन्ही राजेंची बैठक होत असल्याने मराठा समाजाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकवाक्यता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यात आता एकाच प्रश्नावर म्हणजेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे चर्चेसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरातील संभाजीराजे छत्रपती यांच्या घरी जाऊन छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. तर संभाजीराजे आज पुण्यात उदयनराजेंची भेट घेत आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होतं? 16 जून रोजी होणाऱ्या मराठा आंदोलनात उदयनराजे सहभागी होणार का? आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे काय भूमिका मांडतात याची उत्सुकता लागली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सकाळीच अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेज इथे भेट घेतली. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट ठरली. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलं आहे. 

भेटीनंतर छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले?

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलताना म्हणाले की, "एकंदरीत सर्वच मुद्द्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच माहिती देतील." अजित पवारांशी चर्चा करताना काय मार्गदर्शन केलं या प्रश्नावर बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, "मार्गदर्शन हेच केलं की, मराठा समाजासाठी जेवढं काही करणं शक्य आहे. तेवढं त्यांनी करावं. हे अजित पवारांनी मान्य केलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल पुन्हा एकदा अभ्यासला पाहिजे. समजून घेतला पाहिजे आणि जेवढं शक्य असेल ते सगळं केलं पाहिजे." तसेच संभाजीराजेंनी 16 जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भात काही चर्चा झाली का? असं विचारल्यावर या आंदोलनाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं. 

16 जूनपासून कोल्हापुरातून मराठा आंदोलनाची सुरुवात
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर  आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. "राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. 

राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द

राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयाने म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना 2018 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार, कलम 342 अ समाविष्ट करण्यात आलं होतं, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचा युक्तीवाद न्यायालयाने खोडून काढला. मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका योग्य असल्याचं ठरवत मराठा आरक्षणाची तरतूद फेटाळून लावली आहे. आता राज्य सरकार या सर्वातून काय मार्ग काढतं ते पाहणं औत्सुक्याचं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Exclusive : मतदानाआधी सुधीर मुनगंटीवार कन्याका मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेLoksabha Election Nagpur : मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगाNagpur Loksabha Election :  नागपुरात एक तास उशीरा मतदान सुरू झाल्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगाLoksabha Election 2024: भंडारा - गोंदिया मतदान केंद्रावर मतदारांची रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Ravi Kishan : ''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान
Sangli Loksabha : चंद्रहार पाटील सांगली लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल करणार;  विश्वजित कदम उपस्थित राहणार की नाही?
चंद्रहार पाटील सांगली लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल करणार; विश्वजित कदम उपस्थित राहणार की नाही?
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Embed widget