एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Sasoon Hospital : डॉक्टरांची वाट बघतोय! ससून रुग्णालयात रुग्ण बेवारस; आरोग्य यंत्रणा कोलमडली

Pune sasoon Hospital : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Pune Sasoon Hospital : जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयातील रुग्णांना बसत आहे. पुण्यातील ससून आणि काही मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांची आणि नातेवाईकांची गर्दी बघायला मिळायला मिळत आहे. अनेक रुग्ण डॉक्टरांची वाट बघत असल्याचं चित्र आहे. मात्र डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुण्यातील ससून आणि बाकी काही मोठ्या रुग्णालयात रोज शेकडो नागरिक उपचारासाठी येत असतात. त्यांना या रुग्णालयामध्ये कमी पैशांमध्ये उपचार मिळतात आणि सुविधाही चांगली असते. त्यामुळे रुग्णांची कायम गर्दी बघायला मिळते. रोज शस्त्रक्रियाही पार पडत असतात. मात्र आज शासकीय रुग्णालयातील नर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारीही संपात सहभागी असल्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणी आणि शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे. शिवाय डॉक्टर नसल्याने काही अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचं टेन्शन वाढत आहे.

ग्रामीण भागात रुग्णांचे हाल

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात रुग्णालय आहे. गावात पर्यायी रुग्णालय नसल्याने अनेक लोक या रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र या रुग्णालयातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण पुण्यात दाखल होत आहेत. पुण्यातही उपचारासाठी डॉक्टर मिळत नसल्याने नागरिकांना रुग्णांना रस्त्यावर घेऊन उभं राहावं लागत आहे. त्यामुळे संप करा मात्र रुग्णांचा जीव जाईपर्यंत अंत पाहू नका, अशा भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहे. 

नातेवाईक हताश...

"आमचा मुलाचा अपघात झाला आहे. यात मुलाच्या मेंदूला मोठा मार लागला आहे. कालपासून इथे मुख्य डॉक्टरांची आम्ही वाट बघत आहोत. ते डॉक्टर आले नाहीत तर उपचार होत नाहीत. यामुळे आमच्या मुलालाच नाही तर इतर रुग्णांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिणामी एखाद्या अत्यावस्थ असलेल्या रुग्णांचा जीवही जाऊ शकतो. सरकारने यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांनी संप संपवून रुग्णांवर उपचारासाठी परत यावं, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. रुग्णालय मोठं आहे. अनेक रुग्ण आहेत. मात्र त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स कमी पडत आहेत. त्यामुळे मुख्य डॉक्टरांनी रुग्णांचे हाल पाहून तरी परत यावे, अशाही भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget