(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News: वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ४ दलालांना अटक; अनैतिक मानव विभागाची कारवाई
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालेवाडी संकुलातील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार छापा टाकण्यात आला.
Pune Crime News: हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालेवाडी संकुलातील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार छापा टाकण्यात आला. यामध्ये 4 महिलांची सुटका करण्यात आली असून 4 दलालांना अटक करण्यात आली आहे. विजय साहेबराव थोरात (वय 31), राज उर्फ भागवत गुंडरे , निलेश मारवाडी उर्फ राजू, युसुफ सरदार शेख,नि.तलेगांव दाभाडे अशी अटक करण्यात आरोपीची नावे आहेत.
अनैतिक मानवता विभाग बालेवाडी संकुलातील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. शोध पथकातील एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. याच दरम्यान वेश्या व्यवसाय सुर असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी या संकुलात छापा टाकला. ज्यामध्ये 4 महिला या व्यवसायात गुंतलेल्या आढळल्या.त्याने त्याच्या इतर तीन दलाल भागीदारांची नावे दिली. सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना मोबाईल व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे लॉजवर पाठवले जात होते.
बाहेर राज्यातल्या मुली होत्या
युपी, हरियाणा, पश्चिम बंगालमधून मुली आणल्या होत्या. छाप्यात 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये 4 हजारांची रोकड, 35 हजार किमतीचे दोन मोबाईल, 40 रुपये किमतीचे इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यापुर्वी पुण्यातील (Pune) विमाननगर (viman nagar) भागात मसाज सेंटरच्या (spa center) नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक 19 वर्षीय इमदादुल्ला इस्माईल अली याला अटक करण्यात आली होती. मसाज सेंटरचे मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन आणि जयराम वालपुली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथील गल्ली क्रमांक तीनवरील अमेय स्पा नावाच्या बंगल्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना आढळून आले होते, त्यानंतर त्यांनी छापा टाकला होता.