Maharashtra News : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वादावर अखेर शरद पवारांकडून तोडगा! रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी, शरद पवार चिफ पेट्रेन
Maharashtra : बाबासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून आता कुस्तीगीर परिषदेचे कामकाज ही कार्यकारिणी पाहणार आहे.
Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर (Maharashtra Kustigir Parishad) नक्की कोणाचा अधिकार असेल यावरुन मागील काही महिने बरेच वाद-विवाद होताना दिसत आहेत. दरम्यान अखेर या सर्व वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार आणि बृजभुषण सिंग यांच्यातील चांगल्या संबधातून हा तोडगा काढण्यात आला असून अखेर बाबासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. ज्यानंतर आता रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी कुस्तीगीर परिषदेचे कामकाज पाहणार आहे. तसंच शरद पवार हे चिफ पेट्रेन म्हणून या कुस्तीगीर परिषदेला मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद काही दिवसांपूर्वी भारतीय कुस्ती संघाकडून बरखास्त करण्या आली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. मात्र बाळासाहेब लांडगे यांनी या बरखास्तीला न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने देखील बरखास्तीला स्थगिती दिली आणि त्यानंतर या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपणच भरवणार असा दावाही दोन्ही बाजूंकडून करण्यात आला होता. बाळासाहेब लांडगे यांनी डिसेंबर महिन्यात अहमदनगरमधे तर रामदास तडस गटाकडून जानेवारीत महिन्यात पुण्यात ही स्पर्धा होईल असं जाहीर करण्यात आलं होतं.त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायच यावरून पैलवानांमधे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शरद पवार आणि बृजभुषण सिंग यांनी अखेर तोडगा काढलाय. आता परिषदेच्या सचिवपदाचा बाबासाहेब लांडगे यांनी राजीनामा दिला असून नवी कार्यकारिणी नेमण्यात आली आहे, ही कार्यकारिणी पुढीलप्रमाणे...
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नवीन कार्यकारिणी
रामदास तडस- अध्यक्ष
काका पवार- कार्याध्यक्ष
दयानंद भक्त- महासचिव
अमृता भोसले- कोषाध्यक्ष
याशिवाय शरद पवार हे चिफ पेट्रेन आणि बाळासाहेब लांडगे आणि नामदेवराव मोहिते हे पेट्रेन म्हणून काम करणार आहेत. या नव्या रचनेत बाळासाहेब लांडगे यांना पेट्रेन म्हणून सामावून घेण्यात आल आहे. ज्यामुळे त्यांचाही मोठा मान ठेवण्यात आला आहे.
जानेवारीत रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
या तोडग्यामुळे आता यावर्षीच्या महाराष्ट्र केसर कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 11 ते 15 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे.
हे देखील वाचा-