(Source: Poll of Polls)
Baramati And Shirur Loksabha : अजित पवार गटाला एक अंकी जागा; बारामती, शिरुरमध्ये अजित पवारांचे 'दावेदार' कोण?
अजित पवार गटाला एक अंकी जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड आणि परभणीची जागा मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.
पुणे : राज्यात लोकसभेच्या जागावाटपाची (Maharashtra Mahayuti Seat Sharing) चर्चा सुरु आहे. त्यात महायुतीकडून कोणाला किती जागा दिल्या जाणार यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar) गटाला एक अंकी जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड आणि परभणीची जागा मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यात मागील काही दिवसांपासून शिरुर आणि बारामती लोकसभेची राज्यात चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांना उमेदवादी मिळणार असल्याच्या चर्चा आहे. मात्र शिरुरची जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे.
राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून अजित पवार गटाला (Ajit Pawar) एक अंकी जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसापासून लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही आहे. त्यातच अजित पवार जागा वाटपावरुन नाराज असल्याचं दिसत आहे.
बारामती लोकसभेकडे सर्व राज्याचं लक्ष आहे. बारामतीसाठई सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. त्यात नणंद-विरुद्ध म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. दोघींनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय सुनेत्रा पवारांनीदेखील सभा आणि कार्यक्रमांना उपस्थिती लावून लोकसभेची तयारी करताना दिसत आहे. 'आम्ही दोघं मिळून विकास करु', असं सुतोवाच सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांसमोर केलं. यातून उमेदवारी निश्चित असल्याची दाट शक्यता आहे.
त्यासोबतच शिरुर लोकसभा मतदार संघात मात्र वातावरण चांगलंच तापलं आहे. विद्यमान खासदार असलेल्या अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असं अजित पवारांनी खडसावून भर सभेत सांगितलं होतं. त्यातच अमोल कोल्हेंना मीच खासदार केलं असल्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून शिरुर लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरु आहे. उमेदवाराची चाचपणी सुरु असतानाच भाजप आणि शिवसेनेचे नेतेदेखील इच्छूक आहेत. शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून विलास लांडे हे इच्छुक आहेत. तर आढळराव पाटील हे देखील शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपाकडून महेश लांडगे हे इच्छुक आहेत. शिवसेनेचे नेते आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार असल्याचं बोललं जात आहे.
इतर महत्वाची बातमी-