एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : पुणे, बारामती, शिरूर आणि मावळमध्ये कोण बाजी मारणार? मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पुणे जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदारसंघाची (Constituency) मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे, तर शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे. 

पुण्यातील चार मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

4 जून रोजी सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे म्हणजे स्ट्राँग रुमचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. डॉ. दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर हे उपस्थित होते.

मतमोजणी कशाप्रकारे पार पडेल?

मतमोजणीच्या वेळी सुरुवातीला सकाळी 8 वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीला 8 वाजून 30 मिनिटांनी  सुरुवात होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईल आणण्यास मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना आपल्यासोबत मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया 116, पुणे लोकसभा 112, बारामती 124 आणि शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया 112 टेबलद्वारे होणार आहे. मावळमधील पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 24 टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 23 फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल आणि 24 फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी 16 टेबल लावण्यात येणार मावळसाठी 24 तर पिंपरीसाठी 25 फेऱ्या होणार आहेत. तसेच पोस्टल आणि ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 8 टेबल लावण्यात येणार आहेत.

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळमध्ये कोण बाजी मारणार?

पुणे लोकसभाअंतर्गत वडगाव शेरी 22, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट, कसबा पेठ प्रत्येकी 14, कोथरुड 20 तर पर्वती विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी 18 टेबलवर मतमोजणी होणार असून पोस्टल आणि ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 10 टेबलची व्यवस्था असेल. वडगाव शेरी 21, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोंमेंटसाठी प्रत्येकी 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड मतदारसंघासाठी 14 टेबल आणि 23 फेऱ्या, इंदापूर 16 टेबल आणि 21 फेऱ्या, बारामती 18 टेबल आणि 22 फेऱ्या, पुरंदर  20 टेबल आणि 22 फेऱ्या, भोर 24 टेबल आणि 24 फेऱ्या तर खडकवासला विधानसभा मतदार संघासाठी 22 टेबल आणि 24 फेऱ्या होतील.

शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर मतदारसंघासाठी 14 टेबल आणि 25 फेऱ्या, आंबेगाव 14 टेबल आणि 24 फेऱ्या, खेड-आळंदी  16 टेबल आणि 24 फेऱ्या, शिरुर 16 टेबल आणि 27 फेऱ्या, भोसरी 20 टेबल आणि 23 फेऱ्या तर हडपसर विधानसभा मतदार संघासाठी 20 टेबल आणि 26 फेऱ्या होतील. पोस्टल आणि ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 12 टेबल लावण्यात येणार आहेत.

मतमोजणीसाठी मनुष्यबळ

ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण 656 मतमोजणी सहायक, 600 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 640 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 1 हजार 896 मनुष्यबळ तर टपाली आणि ईटीपीबीएस मतमोजणीसाठी 47 मतमोजणी पर्यवेक्षक, 69 मतमोजणी सहायक आणि 58 सूक्ष्म निरीक्षक असे 174 याप्रमाणे एकूण 2 हजार 70 मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मतमोजणीसाठी 162 मतमोजणी सहायक, 137 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 158 सूक्ष्म निरीक्षक, पुणे लोकसभेसाठी 168 मतमोजणी सहायक, 159 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 163 सूक्ष्म निरीक्षक, बारामतीसाठी 164 मतमोजणी सहायक, 152 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 153 सूक्ष्म निरीक्षक, शिरुरसाठी 162 मतमोजणी सहायक, 152 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 166 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पोस्टल आणि ईटीपीबीएस मतमोजणीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघात 14 मतमोजणी सहायक, 7 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 8 सूक्ष्म निरीक्षक, पुणे लोकसभेसाठी 19 मतमोजणी सहायक, 12 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 14 सूक्ष्म निरीक्षक, बारामतीसाठी 20 मतमोजणी सहायक, 10 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 18 सूक्ष्म निरीक्षक तर शिरुर लोकसभा मतदार संघासाठी 16 मतमोजणी सहायक, प्रत्येकी 18 मतमोजणी पर्यवेक्षक आणि सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

वाहनतळ व्यवस्था

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी येणारे कर्मचारी आणि उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पूज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे 600 ते 700 वाहनक्षमता असलेले दुचाकी वाहनतळ फक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी रोही व्हिला लॉन्स लेन नं.7, कोरेगाव पार्क येथे 600 ते 700 वाहनक्षमतेचे दुचाकी आणि चारचाकी वाहनतळ तर द पूना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी 800 ते 900 वाहनक्षमता असलेल्या चारचाकी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे.

याशिवाय, वाहतुकीला अडथळा येऊन वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक वळविण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. मतमोजणीसाठी येणाऱ्या सर्व घटकांना कोणतीही असुविधा होणार नाही, यासाठी निवडणूक प्रशासन सर्व ती काळजी घेत असून नागरिकांनीही सहकार्य करावं, असं आवाहनही डॉ. दिवसे यांनी केलं आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget