एक्स्प्लोर

Lockdown 2 | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये शुकशुकाट

आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये मोडतात. या शहरांमधून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील आयटी उद्योग पुढील काही दिवस बंदच राहणार हे स्पष्ट झालं आहे.

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. ही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या उद्योगांना आजपासून सुरु करण्यास अंशत: परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमधले निर्बंध मात्र कायम आहेत. असं असलं तरी राज्यातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आजपासून 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एकही कंपनी आज सुरु झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या आयटी कंपन्याही आज बंदच राहिल्या.

या आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये मोडत असल्याने या शहरांमधून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आयटी उद्योग पुढील काही दिवस बंदच राहणार हे स्पष्ट झालं आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कर्फ्यू कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण पुणे शहर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलं आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संपूर्ण पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र (contempt zone) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. हे संक्रमणशील क्षेत्र 27 एप्रिलपर्यंत सील करण्यात आलं आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही.

Curfew In Pune | पुणे, पिंपरी चिंचवड सील; हवेली तालुका, बारामती नगरपरिषद हद्दही सील

दोन अटींमुळे कर्मचाऱ्यांची कंपन्यांमध्ये येण्यास अडचण हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये 250 हून अधिक कंपन्या आहेत. इथे काम करणारे कर्मचारी पुणे किंवा पिंपरी चिंचवड इथे राहतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड रेड झोन घोषित केल्यामुळे या शहरातून कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी कंपनीत येऊ शकत नाही. त्यामुळे या कंपन्या अजूनही बंद आहेत. सुरक्षारक्षक सोडला तर कोणीही उपस्थित नाही. हिंजवडीचा आयटी पार्क हा एरव्ही कर्मचाऱ्यांनी गजबजलेला असतो. सरकारने आयटी कंपन्यांना पन्नास टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी दिली असली तरी त्यासाठी दोन अटी घातल्या आहेत. पहिली अट म्हणजे रेड झोनमधले अर्थात हॉटस्पॉटमधील कर्मचारी कंपन्यांमध्ये येणार नाही. दुसरी अट म्हणजे रेड झोन वगळता इतर ठिकाणाहून जरी काही कर्मचारी या कंपन्यांमध्ये आले त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था या कंपनीनी कॅम्पसमध्येच करावी लागणार आहे. या दोन अटींमुळे कर्मचारी त्यांच्या कंपन्यांपर्यंत पोहोचणं अवघड बनलं आहे. त्यामुळे आयटी पार्कमध्ये सध्या इथे शुकशुकाट आहे.

पुण्यातील आयटी क्षेत्र शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुणे बदललं त्यात या आयटी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. मात्र या आयटी क्षेत्रावर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे आणि भविष्यात त्याचा परिणाम पुण्यावरही होण्याची शक्यता आहे.

Lockdown 2 | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये शुकशुकाट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget