एक्स्प्लोर

Puja Khedkar Update : पूजा खेडकरप्रमाणे पुणे मनपात 6 बोगस दिव्यांग अधिकारी? बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा संशय, तपासणी करण्याच्या सूचना पण...

Puja Khedkar Update : पूजा खेडकर प्रमाणे पुणे महापालिकेतील सहा इंजिनिअर्सनी दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे मिळवल्याचा दिव्यांग आयुक्तालयाला संशय आहे.

पुणे: राज्यासह देशात चर्चेत आलेल्या माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणानंतर आता पुन्हा अशी काही प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. पूजा खेडकर प्रमाणे पुणे महापालिकेतील सहा इंजिनिअर्सनी दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे मिळवल्याचा दिव्यांग आयुक्तालयाला संशय आहे. या सहा अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग विभागाने त्यांची कागदपत्रे तपासली आहेत. त्यातून संशय आणखी बळावल्याने दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना पत्र लिहून या सहा इंजीनियर्सची वैद्यकीय तपासणी करायला सांगितली आहे. 

मात्र, या पत्राला एक महिना उलटला असला तरी देखील अद्याप पुणे महापालिकेने या इंजिनियर्सची वैद्यकीय तपासणी केलेली नाही. वेगवेगळ्या कालावधीत हे इंजिनियर्स पुणे महापालिकेत (Pune Municipality) दाखल झाले असून वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत. त्यांच्यावर देखील  दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

* 2001 मध्ये नोकरीत दाखल झालेल्या उपअभियंत्याने अस्थिव्यंग असल्याचं प्रमाणात सादर करून नोकरी मिळवली आहे.
* 2007 मध्ये नोकरीत दाखल झालेल्या शाखा अभियंत्याने देखील अस्थिव्यंग असल्याचं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आहे.
* 2016-2017 मध्ये नोकरीत दाखल झालेल्या शाखा अभियंत्याने अल्प दृष्टी असल्याचं कारण देऊन नोकरी मिळवली आहे.
*  2016-2017 मध्येच नोकरीत दाखल झालेल्या शाखा अभियंत्याने अल्प दृष्टी असल्याचं कारण देऊन नोकरी मिळवली आहे.
*  2016-2017 मध्येच नोकरीत दाखल झालेल्या एका शाखा अभियंत्याने कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवली आहे.
* 2022 मध्ये नोकरीत दाखल झालेल्या कनिष्ठ अभियंत्याने अल्प दृष्टी असल्याचं प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवली आहे.

या इंजिनियर्स वरती दिव्यांग आयुक्तालयाला संशय आहे. सहा अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग विभागाने त्यांची कागदपत्रे तपासली आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या नाहीत, त्यांच्या तपासण्या झाल्यानंतर अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. 

पूजा खेडकर नेमकं प्रकरण काय?

पूजा दिलीप खेडकर (Pooja Khedkar) 2023 च्या बॅचची आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात तिची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम इथं बदली करण्यात आली होती. पूजा खेडकरने (Pooja Khedkar) दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. 

याच आधारावर तिला विशेष सवलत मिळाली आणि ती आयएएस झाली. त्यानंतर तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिली. तसेच पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
Embed widget