(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi's visit to Pune : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात महाविकास आघाडीचे नेते करणार 'गो बॅक मोदी', मलिकांवरील कारवाईच्या निषेधार्थ आक्रमक पवित्रा
PM Modi's visit to Pune : 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात 'गो बॅक मोदी' अशा घोषणा देत मलिकांच्या अटकेचा निषेध करणार आहेत.
PM Modis Tour on Pune : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik ) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात या घटनेचा निषेध करत विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आता 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या पुणे दौऱ्यातही महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात 'गो बॅक मोदी' अशा घोषणा देत मलिकांच्या अटकेचा निषेध करणार आहेत.
मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज पुण्यात नाना पेठ चौकात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले असून भाजप आणि केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप या आंदोलनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी 6 तारखेला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांना 'गो बॅक मोदी' अशा घोषणा देणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांना दोन दिवसांपूर्वी पहाटेच ईडीने त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी करून त्यांना अटक केली. अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिक यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे आघाडी सरकारमधील दुसरे मंत्री आहेत.
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईमधील मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
महत्वाच्या बातम्या
- Nawab malik: नवाब मलिकांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी
- Chandrakant Patil : मलिकांनंतर EDची नोटीस मिळालेले संजय राऊत, अजित पवारांचे आता काय होणार?
-
Nawab Malik ED : नवाब मलिकांवर ईडीची कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात झाली? जाणून घ्या
-
Rohit Pawar : नवाब मलिकांनी उघड केलेलं ड्रग्ज रॅकेट कनेक्शन गुजरातपर्यंत; त्यामुळेच कारवाई , रोहित पवारांचा हल्लाबोल