एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, छगन भुजबळ यांचा मोठा दावा

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी बीडच्या ओबीसी महाएल्गार सभेत भाजप नेत्यांना देखील सतर्क केलं. देवेंद्र फडणवीस नागपूरला असताना जीआर काढला गेल्याचा दावा भुजबळ यांनी केला.

बीड : ओबीसी महाएल्गार सभेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे, त्यांनी सावध राहावं, ही मंडळी तुमच्या वाईटावर आहेत, असं म्हटलं. त्यांचे टार्गेट ओबीसी नाही देवेंद्र फडणवीस आहेत, असंही छगन भुजबळ म्हणाले. या ओबीसी महाएल्गार सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

Chhagan Bhujbal alert to Devendra Fadnavis : त्यांचं टार्गेट ओबीसी नव्हे देवेंद्र फडणवीस : छगन भुजबळ

छगन भुजबळ पुढे म्हणाले, मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हे हायकोर्टाचे निर्णय आहेत. अरे तुम्ही कसं काय देता. सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं की मराठा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही. मग तुम्ही कसं काय देता. त्यावेळी मुख्यमंत्री कुठं होतं, मुख्यमंत्री नागपूरला होते, इथं यांनी निर्णय घेतला. पात्र शब्द काढून टाकला. मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना  तुमच्या वाईटावर आलेली आहेत. तुम्हाला अडचणी निर्माण करणारी आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125-135 आमदार मिळाले आहेत. त्या ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी आज दूधखुळे राहिलेले नाहीत. त्यामुळं यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढावा लागेल, असं छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना सांगितलं. 

विजय वडेट्टीवार अंबडला आले होते, त्यांनी सांगितलं पक्ष वगैरे बाजूला पिवळा झेंडा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. हिंगोलीच्या रॅलीला बोलावलं, काय माहिती प्रेशर आलं, येतो म्हणले आलेच नाहीत. नगरला बोलावलं , पंढरपूरला बोलावलं, बीडला रॅली झाली, आलेच नाहीत. तुम्ही ओबीसी सोबत राहणार असं म्हटलं होतं का आला नाहीत, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं सांगत असल्याचं पाहायला मिळतं. यावर छगन भुजबळ यांनी वडेट्टीवार यांना एकच भूमिका घ्या असं सांगितलं. तासा तासाला तुम्ही जर बदलायला लागला तर ओबीसी समाजाचा घात होईल, असं छगन भुजबळ म्हणाले. आम्ही पक्षासाठी काम करत नाही, आम्ही ओबीसीसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही, असं देखील भुजबळ म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget